शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

३२ टक्के पेरण्या अपूर्णच

By admin | Updated: July 25, 2015 01:14 IST

गेल्या १५ ते २० दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने दोन दिवसांपुर्वी हजेरी लावली. जिल्ह्यात सध्या पावसाची रिपरिप सुरू आहे.

पावसाची हुलकावणी कारणीभूत : आतापर्यंत ६८ टक्के पेरण्या चंद्रपूर : गेल्या १५ ते २० दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने दोन दिवसांपुर्वी हजेरी लावली. जिल्ह्यात सध्या पावसाची रिपरिप सुरू आहे. मात्र जिल्ह्यात अद्यापही शंभर टक्के पेरण्या आटोपल्या नसून पावसाच्या हुलकावणीने ३२ टक्के पेरणीचे कामे खोळंबल्याचे कृषी विभागाच्या अहवालात म्हटले आहे. मृग नक्षत्रात समाधानकरक पाऊस झाला. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी पेरण्यांसाठी लगबग सुरू करून कामांना सुरूवात केली. त्यावेळी चार ते पाच दिवस झालेल्या पावसाने यावर्षी समाधानकारक पाऊस पडेल, अशी अशा शेतकरी व्यक्त करू लागले. मात्र पावसाने हुलकावणी दिली. त्यानंतर तब्बल १५ ते २० दिवस पाऊस झाला नाही. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी पेरणी केली त्या शेतकऱ्यांची पिके उगवून जमिनीतच करपू लागली. अनेक शेतकऱ्यांनी उपलब्ध सिंचन व्यवस्थेच्या माध्यमातून पाणी देऊन पिके वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र यात अनेकांची पिके तीव्र उन्हामुळे करपून गेली. पावसाने १५ ते २० दिवस हुलकावणी दिल्याने हतबल झालेला शेतकरी संकटात सापडला होता. त्यानंतर २१ जुलैला पावसाचे आगमन झाले. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून जिल्ह्यात सध्या रिमझीम पाऊस सुरू असल्याने शेतकऱ्यांना थोडासा दिलासा मिळाला आहे. मात्र ज्या शेतकऱ्यांचे पिके करपून गेली त्यांना दुबार पेरणी करावी लागत आहे. जिल्ह्यात भाताचे १ लाख ६६ हजार ३१२ हेक्टर क्षेत्र असून यापैकी २२ हजार ५५३ क्षेत्रावर रोवणी झाली आहे. तर, कापूस, सोयाबीन या पिकांचीही पेरणी मोठ्या प्रमाणात अपूर्ण आहे. दोन दिवसांपासून सुरू असलेल्या रिमझीम पावसाने ज्या शेतकऱ्यांच्या पेरण्या अपूर्ण आहेत त्यांनी पेरणीसाठी लगबग सुरू केल्याचे दिसून येते. (स्थानिक प्रतिनिधी)१४ टक्के हेक्टर क्षेत्रावर रोवणी अनेक शेतकऱ्यांची पेरणीची कामे खोळंबली असली तरी ज्या शेतकऱ्यांना सिंचनाची सुविधा उपलब्ध आहे, त्यांनी लवकर पऱ्हे टाकल्याने १४ टक्के क्षेत्रावर रोवणी झाल्याचे कृषी विभागाच्या अहवालात म्हटले आहे. तर आवत्या १०६ टक्के क्षेत्रावर झाले आहे.मुसळधार पावसाचीशेतकऱ्यांना प्रतीक्षाचजिल्ह्यात पावसाची रिपरिप सुरू असली तरी अद्यापही मुसळधार पाऊस झालेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना मुसळधार पावसाची प्रतीक्षा लागली आहे. मुसळधार पाऊस झाल्यास रोवणीच्या कामांना वेग येईल. तर इतर पिकांनाही पावसाचा फायदा होणार आहे. ५१ टक्के सोयाबीन पेरण्याजिल्ह्यात सोयाबीन पिकाचे सर्व साधारण क्षेत्र ८६ हजार ४६० असून यापैकी ५१ टक्के क्षेत्रावर पेरण्या आटोपल्या आहेत. तर कापूस पिकाचे यावर्षी दुप्पटीने क्षेत्र वाढल्याने २४९ टक्के क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत.