शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

टोलवरून घ्यायचे होते ३२ कोटी; वसूल केले २२५ कोटी

By admin | Updated: August 18, 2014 23:23 IST

राज्यातील नऊ टोल नाक्यांना एकत्रित करून ताडाळीच्या टोल नाक्यावरून वसूल होत असल्याचा प्रकार अलीकडेच प्रकाशात आला आहे. एवढेच नाही तर, २००४ पासून या नाक्यावरून बोगस पावत्या देऊन

चंद्रपूर : राज्यातील नऊ टोल नाक्यांना एकत्रित करून ताडाळीच्या टोल नाक्यावरून वसूल होत असल्याचा प्रकार अलीकडेच प्रकाशात आला आहे. एवढेच नाही तर, २००४ पासून या नाक्यावरून बोगस पावत्या देऊन जनतेची आणि सरकारची सर्रास लूट सुरू असल्याचा आरोप विधान परिषद सदस्य शोभाताई फडणवीस यांनी केला आहे. शासकीय अध्यादेशानुसार, हा टोल नाका २०१५ मध्येच बंद करायला हवा होता. मात्र, तसे न करता २०२६ पर्यंत मुदतवाढ मिळणे हा जनतेशी केलेला दगाफाटा असल्याचे शोभाताई फडणवीस यांचे मत आहे. या विरोधात येत्या २० आॅगस्टला ताडाळी टोल नाक्यासमोर बैठा सत्याग्रह करण्याचा आणि कुणालाही टोल न भरू देण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. या संदर्भात एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्यांना विचारणा केली असता आपणाकडे वसुलीचा कसलाही हिशेब नसल्याचे ते सांगतात. याची देखरेख मुंबईच्या कार्यालयातून होते, असे त्यांचे म्हणणे आहे. ३२ कोटी रूपयांची टोल वसुली या नाक्यावरून करायची होती. प्रत्यक्षात आजवर २२५ कोटी रूपयांची वसुली झाल्याचा आरोप त्यांनी केला. २००४ ते २०१४ या काळात कंत्राटदाराने बोगस पावत्या देऊन नाका घेतल्याचाही गंभीर आरोप त्यांनी पत्रकार परिषदेत केला. मात्र या संदर्भात आपणास कसलीही माहिती नसल्याचे एमएसआरडीसीचे अधिकारी सांगतात. मात्र हा प्रकार त्यांच्याच संगनमातातून सुरू असल्याचा शोभातार्इंचा आरोप आहे. आपले आंदोलन टोल नाका बंद होईपर्यंत असेल, असेही त्यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला ट्रान्सपोर्ट व्यवसायी कुक्कु साहनी, सुरेश शर्मा, लायन्स क्लबचे शैलेश बागला, प्रकाश कोठारी, चंद्रपूर बचाव समितीचे डॉ. गोपाल मुंधडा, सुहास अलमस्त, आर्यएमएचे डॉ. मंगेश गुलवाडे आदी उपस्थित होते.(जिल्हा प्रतिनिधी)