शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

3 लाख 31 हजार नागरिकांची कोरोनाविरुद्ध लढण्याची उमेद !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 05:00 IST

चंद्रपूर जिल्ह्यात २२ लाख ४२ हजार ६२ नागरिकांना कोविड प्रतिबंधक लस देण्याचे नियोजन जिल्हा प्रशासन व आरोग्य यंत्रणेने तयार ठेवले आहे. ५० हजार लसी मिळाल्या तरी एकाच दिवस लसीकरण पूर्ण करण्याची श प्रशासनाने ठेवली आहे. मात्र, लस पुरवठ्याच्या गोंधळात नियोजनाची उद्दिष्टपूर्ती करणे शक्यच नाही. 

ठळक मुद्देलसीचा डोस घेतला : ६४ हजार ८९६ जणांचा दुसरा डोसही पूर्ण

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कोरोनावर मात करण्यासाठी लसीकरणाशिवाय पर्याय नाही, यावर आता नागरिकांचा विश्वास वाढू लागला आहे. लशींचा तुटवडा असतानाही वेळात वेळ काढून रांगेत उभे राहून लस घेण्याची मानसिकताही त्यांनी तयार केली. परिणामी मंगळवार(दि. १९)पर्यंत जिल्ह्यात ३ लाख ३१ हजार ५६३ जणांनी कोविड प्रतिबंधक लस घेतली. त्यामध्ये दुसरा डोस घेणाऱ्या ६४ हजार ८९६ नागरिकांचा समावेश आहे. लस घेणाऱ्या नागरिकांच्या मनात आता कोरोना विषाणूविरुद्ध लढण्याची मानसिकताही तयार होऊ लागली आहे.चंद्रपूर जिल्ह्यात २२ लाख ४२ हजार ६२ नागरिकांना कोविड प्रतिबंधक लस देण्याचे नियोजन जिल्हा प्रशासन व आरोग्य यंत्रणेने तयार ठेवले आहे. ५० हजार लसी मिळाल्या तरी एकाच दिवस लसीकरण पूर्ण करण्याची श प्रशासनाने ठेवली आहे. मात्र, लस पुरवठ्याच्या गोंधळात नियोजनाची उद्दिष्टपूर्ती करणे शक्यच नाही. त्यामुळे उपलब्ध लसीनुसार दररोज ५० ते ७५ केंद्रांवर लसीकरण केले जात आहे. आता ४५ वर्षांपेक्षा जास्त वयोगटांतील नागरिकांच लस दिली जात आहे. पुरेसा लससाठा उपलब्ध होत नसल्याने चंद्रपूर महानगरपालिका व जिल्ह्यातील सर्व केंद्रांवर लसीकरण सुरू ठेवणे अशक्य झाले. आरोग्य कर्मचारी व प्रंटलाईन वर्करचा पहिला व डोस पूर्ण होण्याच्या टप्प्यात आला आहे. लस घेतल्याने कोरोना झाल्यानंतर प्रकृतीत समस्या निर्माण होत नाही, हे आरोग्य विभागाने जाहीर केले. त्यामुळे लसीकरणाकडे नागरिकांचा कल वाढला. ३ लाख ३१ हजार नागरिकांनी लस घेतली. लोकसंख्येच्या तुलनेत लसीकरण अत्यल्प आहे. ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरी भागात जास्त लसीकरण झाले आहे.कोरोनाविरुद्ध लढण्याची सकारात्मक मानसिकता नागरिकांना निश्चितपणे बळ देणार, असा निष्कर्ष वैद्यकीय तज्ज्ञांनी काढला आहे. लस घेतल्याने हिंमत वाढल्याची कबुली नागरिकही देत आहेत. 

८ हजार ३६७ सहव्याधी नागरिकांना दिलासाचंद्रपूर मनपा क्षेत्र व ग्रामीण भागात ५२ हजार ३२९ सहव्याधी नागरिकांनी पहिला डोस घेतला. प्रतिकारशक्तीमुळे शासनाने या वयोगटाला प्रथम दिले होते. मंगळवारपर्यंत ८ हजार ३६७ जणांनी दुसरा डोस घेतला. दुसरा डोस घेतल्यामुळे कोरोनाविरुद्ध लढण्याची सकारात्मकता निर्माण झाल्याचा आनंदही अनेकांनी व्यक्त केला आहे.

लशीअभावी मोहीम मंदावली६० वर्षांवरील नागरिकांना लस घेण्यासाठी उपलब्ध डोसनुसार चंद्रपूर मनपा क्षेत्रात तीन किंवा चार केंद्र सुरू असतात. परंतु, जास्त डोस मिळत नसल्याने ज्येष्ठ नागरिकांना घरी परत जावे लागते. परिणामी, नागरिकांचे लसीकरण मंदावले आहे.  पुरेसे डोस मिळाले तरच लसीकरण पूर्ण करून कोरोनाविरुद्ध लढा देऊन मात करता येऊ शकेल. 

१८ ते ४४ वयोगटांतील २० हजार ५१२ जणांनी घेतला डोसकेंद्रात आतापर्यंत १८ ते ४४ वयोगटांतील २० हजार ५१२ जणांचे लसीकरण झाले.  केंद्र व राज्य शासनाच्या आदेशानुसार या वयोगटाचे लसीकरण सध्या बंद करण्यात आले. त्यामुळे काही केंद्रांवर ४५ व ६० वर्षांवरील नागरिकांना लस घेणे शक्य होत आहे.   

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या