शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
4
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
5
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
6
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
7
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
8
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
9
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
10
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
11
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
12
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
13
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
14
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
15
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
16
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
17
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
18
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
19
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
20
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
Daily Top 2Weekly Top 5

वीजजोडणीसाठी २८ हजार शेतकऱ्यांचे अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2019 22:28 IST

लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर : मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेत मार्च २०१९ अखेरपर्र्यंत ५० हजार शेतकऱ्यांना वीजजोडणी देण्याचे महावितरणचे उद्दिष्ट ...

ठळक मुद्देमुख्यमंत्री सौर कृषिपंप : १ हजार ६३ शेतकऱ्यांनी भरले पोर्टलवरून अर्ज

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेत मार्च २०१९ अखेरपर्र्यंत ५० हजार शेतकऱ्यांना वीजजोडणी देण्याचे महावितरणचे उद्दिष्ट आहे. या योजनेला शेतकऱ्यांकडून प्रतिसाद मिळत असून महावितरणने पोर्टल सुरु केल्यानंतर १५ दिवसांत २८ हजार शेतकऱ्यांनी अर्ज सादर केले. चंद्र्रपूर परिमंडळातील १ हजार ६३ शेतकऱ्यांनी या पोर्टलवरून अर्ज भरले आहेत.शाश्वत जलस्त्रोत उपलब्ध असलेल्या शेतकऱ्यांना पारंपरिक वीजजोडणी मिळण्यात अडचणी आहेत. अशा शेतकऱ्यांनी प्राधान्याने सौर कृषिपंप देण्यात येणार आहेत. महावितरणच्या पोर्टलवरून अर्ज केलेल्या २८ हजार शेतकऱ्यांपैकी २ हजार शेतकऱ्यांच्या जमिनीचा सर्व्हेक्षण करण्यात आला. २ हजार २९३ शेतकऱ्यांचे अर्ज मंजूर करण्यात आलेले आहेत. याशिवाय अर्ज भरताना काही त्रुटी असलेले ४१९ अर्ज सध्या नामंजूर करण्यात आले असून शेतकऱ्यांनी अर्जातील माहिती दुरूस्त करून आपले अर्ज पुन्हा महावितरणच्या पोर्टलवरून भरावेत. योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी महावितरणने या योजनेच्या संदर्भात शेतकऱ्यांकडून वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न व त्यांची उत्तरे असलेली मार्गदर्शन पुस्तिका व व्हॉट्सअ‍ॅप अशा माध्यमांचा वापर करण्यात येत असून क्षेत्रीयस्तरावरील सर्व कर्मचारी व अभियंते सोशल माध्यमांद्वारे शेतकऱ्यांसोबत संवाद साधत असल्यामुळे शेतकऱ्यांकडून या योजनेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. शेतकऱ्यांना कृषिपंपाकरिता वीजजोडणी घेण्यासाठी महावितरणच्या वेबसाईटवर स्वतंत्र पोर्टल उपलब्ध करून देण्यात आले असून त्याचा लाभ घेत आजपर्यंत राज्यातील सुमारे २८ हजार शेत्२ाकऱ्यांनी सौर कृषिपंपासाठी अर्ज केले आहेत.विशेषत: मराठवाड्यातील शेतकऱ्यांकडून या योजनेला मोठा प्रतिसाद मिळत आहे. मागील मागील १५ दिवसांत चंद्र्रपूर परिमंडळातील चंद्र्रपूर विभाग २४, बल्लारपूर ४५ आणि वरोरा विभागातील १५२ तसेच गडचिरोली मंडळातील गडचिरोली ३५१, आलापल्ली २७९ आणि ब्रह्मपुरी विभागातील २१२ अशा एकूण १०६३ शेतकऱ्यांनी अर्ज पोर्टलवरून भरले आहेत.