शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
2
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
3
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
4
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
5
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
6
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
7
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
8
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
9
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
10
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
11
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
12
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
13
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
14
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
15
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
16
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
17
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
18
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
19
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
Daily Top 2Weekly Top 5

वेकोलिकडून २६३ शेतकऱ्यांची फसवणूक

By admin | Updated: March 26, 2017 00:36 IST

वेकोलि व्यवस्थापनाने सिनाळा वाढीव प्रकल्पासाठी चार गावातील २६३ शेतकऱ्यांची ६४२ एकर जमीन अधिग्रहित केली.

६४२ एकर जमीन अधिग्रहित : मोबदल्यासाठी खाण बंदचा इशाराचंद्रपूर : वेकोलि व्यवस्थापनाने सिनाळा वाढीव प्रकल्पासाठी चार गावातील २६३ शेतकऱ्यांची ६४२ एकर जमीन अधिग्रहित केली. मात्र सहा महिने लोटूनही मोबदला न देता शेतकऱ्यांची फसवणूक केली. सात दिवसात मोबदला न दिल्यास दुर्गापूर खुली खाण बंद करण्याचा इशारा सिनाळा ग्रामपंचायतीच्या सरपंच संगीता मोटघरे यांनी पत्रकार परिषदेत दिला.दुर्गापूर खुल्या खाणीला लागून असलेल्या सिनाळा गावालगत नवीन प्रकल्प वेकोलिच्या वतीने सुरू केला जात आहे. यासाठी सिनाळा, मसाळा, मसाळा तु. आणि नवेगाव या चार गावातील सुमारे २६३ शेतकऱ्यांची ६४२ एकर जमीन २००८ मध्ये अधिग्रहित केली. २०१० मध्ये सेक्शन ९ लावला. ३ सप्टेंबर २०१६ ला झालेल्या बैठकीत वेकोलिचे मुख्य महाप्रबंधक आभासचंद्र सिंग यांनी पाच महिन्याच्या आत मोबदला दिला जाईल, २७२ लोकांच्या नोकरीची प्रक्रिया एका महिन्यानंतर सुरू केली जाईल. चारही गावांचे पुनर्वसन एकाच वेळेस केले जाईल, शेती मजुरांना कंत्राटी स्वरूपात कामे दिली जातील. उर्वरित घरांचे मूल्यांकन एका महिन्यात करून मोबदला देण्यात येणार असल्याचे लेखी आश्वासन दिले होते.मात्र पाच महिने लोटूनही या लेखी आश्वासनावर काहीही झालेले नाही. त्यामुळे जमिनी विकता येत नाही आणि मोबदलाही मिळालेला नाही, अशी शोकांतिका प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांची झाली आहे. त्यामुळे सर्व शेतकरी कमालीचे अडचणीत सापडले आहेत.वेकोलिने सात दिवसात मोबदला न दिल्यास दुर्गापूर खुली खाण बंद करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. पत्रकार परिषदेला ग्रामपंचायत सदस्य अश्विना रामटेके, माया आत्राम, बाबूराव रायपूरे, मंगलदास रामटेके, गंगाधर माऊलीकर, बबन मडावी, श्याम रोहनकर व अनेक प्रकल्पग्रस्त शेतकरी उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)