शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
4
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
5
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
6
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
7
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
8
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
9
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
10
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
11
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
12
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
13
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
14
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
15
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
16
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
17
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
18
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
19
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
20
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
Daily Top 2Weekly Top 5

सोयाबीन व धान उत्पादकांना हेक्टरी २५ हजारांची मदत द्यावी

By admin | Updated: November 23, 2014 23:15 IST

केंद्रात व राज्यात भाजपाचे सरकार आल्यानंतर तांदळाची निर्यात बंद केली. त्यामुळे धानाचे दर घसरले असून निर्यातबंदी उठली नाही तर धान उत्पादक शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ येणार आहे.

चंद्रपूर : केंद्रात व राज्यात भाजपाचे सरकार आल्यानंतर तांदळाची निर्यात बंद केली. त्यामुळे धानाचे दर घसरले असून निर्यातबंदी उठली नाही तर धान उत्पादक शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ येणार आहे. यंदा सोयाबीन शेतकऱ्यांच्या हातातून गेले. त्यामुळे सोयाबीन व धान उत्पादक शेतकऱ्यांना सरकारने हेक्टरी २५ हजारांची मदत करावी, अशी मागणी विधानसभेतील काँग्रेसचे उपगटनेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी शनिवारी आयोजित पत्रकार परिषदेत केली.यावेळी ते पुढे म्हणाले, विधानसभा निवडणुकीपूर्वी जनतेला भाजप नेत्यांनी टोलमुक्त महाराष्ट्रासह मोठमोठी आश्वासने दिली. या आश्वासनाची पूर्तता करण्याची अपेक्षा नागरिकांना आहे. मात्र बहुमतात नसलेल्या सरकारकडून टोलमुक्त महाराष्ट्र अशक्य असल्याचेच दिसून येत आहे. त्यामुळे महाराष्ट्रात बहुमतात नसलेल्या सरकारने टाईम बाऊंड घोषित करावा, अशी मागणीही त्यांनी केली. पुढील वर्षी चंद्रपुरात मेडीकल कॉलेज निर्माण होईल, असे आश्वासन अर्थमंत्र्यांनी दिले होते. परंतु मेडिकल कौन्सिलने मेडिकल कॉलेजची परवानगी नाकारली असल्याची माहिती वडेट्टीवार यांनी यावेळी दिली. त्यामुळे चंद्रपुरातील केंद्रीय रसायन व खते राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी यासाठी प्रयत्न करावे. महानगरपालिकांतर्गत येणाऱ्या व्यापाऱ्यांना एलबीटी रद्द करण्याचे आश्वासन सध्याच्या सरकारकडून देण्यात आले होते. त्याची पूर्तता सरकारने करावी. अन्यथा व्यापाऱ्यांकडून या सरकारविरोधात जाहीर पत्र काढावे, असे आवाहनही त्यांनी केले. पत्रकार परिषदेला काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे, महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष संगीता अमृतकर, डॉ. रजनी हजारे, संतोष लहामगे, रामू तिवारी आदी उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)