शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

२३५ जणांनी दाखल केले उमेदवारी अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:38 IST

चंद्रपूर : जिल्ह्यातील ६२९ ग्रामपंचायतींमध्ये १५ जानेवारी २०२१ रोजी होणाºया सार्वत्रिक निवडणुकीसाठी सोमवारपर्यंत २३५ जणांनी उमेदवारी अर्ज ...

चंद्रपूर : जिल्ह्यातील ६२९ ग्रामपंचायतींमध्ये १५ जानेवारी २०२१ रोजी होणाºया सार्वत्रिक निवडणुकीसाठी सोमवारपर्यंत २३५ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल कले. बुधवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवट दिवसआहे. त्यामुळे उमेदवारांची गर्दी होऊ नये, यासाठी निवडणूक विभागाने यंत्रणा सज्ज केली आहे.

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास २३ डिसेंबरपासून सुरूवात झाली. ३० डिसेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे. ४ जानेवारीला उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. त्याच दिवशी उमेदवारांना निवडणूक चिन्ह वाटप केले जाणार आहे. यंदा सरपंच पदाचे आरक्षण निवडणुकीनंतर जाहीर करण्यात येणार आहे. सोमवारी चंद्रपूर, मूल तालुक्यात प्रत्येकी १, चिमूर ४ आणि वरोरा तालुक्यातील ग्रामपंचायतींसाठी २२ नामांकन अर्ज दाखल झाले होते. सोमवारी चिमूर तालुक्यात ३५ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते. मंगळवारी शेवटचा दिवस असल्याने उमेदवारांची आपले सेवा केंद्रावर संख्या वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. नामनिर्देशन पत्र भरण्याची सुविधा राज्य निवडणूक आयोगाचे वेबसाईटवर उपलब्ध आहे. संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत स्वीकारण्यात येणार आहे. संगणकीकृत पध्दतीने नामनिर्देशन पत्राची प्रत संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांना सादर करणे आवश्यक असल्याचे जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी कळविले आहे.

बॉक्स

असा आहे निवडणूक कार्यक्रम

२३ डिसेंबर २०२० पासून ३० डिसेंबर २०२० पर्यंत नामांकन सादर करता येणार आहे. ३१ डिसेंबर २०२० रोजी नामांकनाची छाणनी होईल. ४ जानेवारी २०२१ रोजी नामांकन परत घेता येईल. त्याचबरोबर उमेदवारांना चिन्ह नेमून देण्यात येतील. मतदान १५ जानेवारी २०२१ रोजी आणि मतमोजणी १८ जानेवारी २०२१ रोजी होणार आहे.

तालुकानिहाय दाखल झालेले उमेदवारी उर्ज

राजुरा ३६, कोरपना ८, गोंडपिपरी २६, चंद्रपूर २८, मूल २६, पोंभुणार् २, बल्लारपूर ३१, ब्रह्पुरी ४१, सिंदेवाही ५, सावली १३, चिमूर ३९, नागभीड ३०, वरोरा ७२, भद्रावती ३२