शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
2
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
3
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
4
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
5
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
6
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
7
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
8
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
9
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
10
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
11
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
12
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
13
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
14
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
15
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
16
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
17
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
18
ज्या आवाजाने कोट्यवधी रसिकांचं मन जिंकलं, त्यांच्याच हातची चवही होती कमाल! आशाताईंनी उभारलं होतं हॉटेल साम्राज्य
19
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
20
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
Daily Top 2Weekly Top 5

विसापुरातील २०० घरे धूरमुक्त

By admin | Updated: June 13, 2017 00:32 IST

तालुक्यातील विसापूर येथील २०० कुटूंबाना घरगुती गॅस जोडणीचे वितरण करण्यात आले.

गॅस जोडणीचे वितरण : सुधीर मुनगंटीवार यांची उपस्थिती लोकमत न्यूज नेटवर्कबल्लारपूर : तालुक्यातील विसापूर येथील २०० कुटूंबाना घरगुती गॅस जोडणीचे वितरण करण्यात आले. यामुळे या घरातील चुली धुरमुक्त झाल्या असून महिलांना दिलासा मिळाला आहे. या कार्यक्रमाचे आयोजन बल्लारपूर वन परिक्षेत्र अधिकारी कार्यालयाने केले होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अर्थ, नियोजन व वनमंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार होते. प्रमुख पाहुणे म्हणून पाणी पुरवठा विभागाचे मंत्री बबनराव लोणीकर, वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल, भाजपा ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष तथा बल्लारपूरचे नगराध्यक्ष हरिश शर्मा, बल्लारपूर तालुका भाजपाचे अध्यक्ष किशोर पंदीलवार, पंचायत समितीचे सभापती गोविंदा पोडे, जिल्हा परिषद सदस्य अ‍ॅड. हरिश गेडाम, विसापूरच्या सरपंच रिता जिलटे, उपसरपंच सुनील रोंगे, विद्या गेडाम, अशोक थेरे यांची उपस्थिती होती.यावेळी ना.सुधीर मुनगंटीवार म्हणाले, धुरामुळे घरात प्रदूषण वाढते. महिलांना डोळ्याच्या आजारांना सामोरे जाणे लागते. महिलांच्या जीवनात आत्मसन्मान जागविण्यासाठी विविध योजना आहेत. त्यांच्या जीवनात आनंद निर्माण करण्यासाठी पंतप्रधान उज्वला गॅस जोडणी योजना कार्यान्वित करण्यात आली. यामुळे महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे. जंगल तोड करुन सरपणासाठी जाण्याची वेळ महिलांवर येवू नये. त्यांची पायपीट होवू नये. घरातील धूर प्रदूषण टाळण्यासाठी गॅस जोडणी महत्वाची असल्याने त्यांनी सांगितले. ज्या घरात गॅस जोडणी पूर्वीच देण्यात आली, त्या घरी दुसऱ्यांदा गॅस जोडणी देण्याचे कटाक्षाने टाळावे. गरजूनाच लाभ देण्यात यावा, असेही ना. मुनगंटीवार यांनी सांगितले. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे, ना. बबनराव लोणीकर, चंदनसिंह चंदेल यांनी मार्गदर्शन केले. यावेळी गावकऱ्यांसह लाभार्थि मोठ्या संख्येनी उपस्थित होते.