शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

१ कोटी ४ लाख ७१ हजार १६१ वृक्षांची लागवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2019 23:47 IST

पर्यावरणाचा समतोल राखता यावा, वाढते तापमान, पाण्याची टंचाई, जमिनीची धूप, यासारख्या नैसर्गिक आपत्तीपासून मानवाचे संरक्षण व्हावे, यासाठी राज्याचे वित्त, नियोजन, वन तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी चार वर्षात ५० कोटी वृक्षलागवडीची मोहीम सुरू केली.

ठळक मुद्देमोहिमेला २३ दिवस पूर्ण : जिल्हाभरात वृक्षारोपण सुरूच, ग्रामपंचायत व सामाजिक संस्थांचा सहभाग

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : पर्यावरणाचा समतोल राखता यावा, वाढते तापमान, पाण्याची टंचाई, जमिनीची धूप, यासारख्या नैसर्गिक आपत्तीपासून मानवाचे संरक्षण व्हावे, यासाठी राज्याचे वित्त, नियोजन, वन तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी चार वर्षात ५० कोटी वृक्षलागवडीची मोहीम सुरू केली. या मोहिमेला उत्तम प्रतिसाद मिळत असून राज्यात ५० कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प पूर्णत्वाला नेण्यासाठी अवघ्या २३ दिवसातच राज्यात २३ कोटी तर जिल्ह्यात १ कोटींपेक्षा अधिक वृक्ष लागवड करण्यात आली.पर्यावरणाच्या संवर्धनाची उपयुक्तता पटल्याने नागरिक, स्थानिक स्वराज्य संस्था, प्रशासन, सामाजिक संस्थांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे अवघ्या २३ दिवसात राज्यात १४ कोटी ७४ लक्ष ९७ हजार वृक्षलागवड करण्यात आली आहे. राज्याने आतापर्यंत ४०.४९ टक्के उद्दिष्ट गाठले. यामध्ये ठाणे जिल्हा आपल्या उद्दिष्टात अव्वल ठरला आहे. ठाणे जिल्ह्याचे ६६ लक्ष ८७ हजार ५५० वृक्षलागवडीचे उद्दिष्ट असून ६९ हजार ३३३ वृक्षलागवड करून ७८. ४० टक्के गाठले आहे.सिंधुदुर्ग जिल्हा दुसऱ्या क्रमांकावर असून ४१ लक्ष ६५ हजार ९०० वृक्षलागवडीचे लक्ष्य होते. आतापर्यंत ५७ हजार १८५ वृक्षांची लागवड करून ७५.८१ टक्के गाठले. कोल्हापूर जिल्ह्याने ८५ लक्ष ८७ हजार ७८५ वृक्षलागवड करून ७३.८७ टक्के ध्येय गाठले आहे. चंद्रपूर जिल्ह्याने २५ दिवसात १ कोटी ४ लक्ष ७१ हजार १६१ वृक्षांची लागवड केली.जिल्ह्यातून वन विभागाने २२ लक्ष १४ हजार ९६० वृक्षांची लागवड करून ८४.५६ टक्के मध्य चांदा विभागाने २४ लक्ष ४० हजार ४६४ वृक्षलागवड करून ८६.५९ टक्के, सामाजिक वन विभागाने ७ लक्ष १५ हजार ६९६ वृक्षलागवड करून ४८.२ टक्के तर ग्रामपंचायतींनी १० लक्ष ६९ हजार २३२ वृक्षलागवड करून ५३.८४ टक्के आणि माय प्लांट अ‍ॅपद्वारे जिल्ह्यात १ हजार ५७३ वृक्षांची लागवड करण्यात आले आहे.लोकसहभागातून उद्दिष्ट होणार पूर्णचंद्रपूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात लोकसहभाग वाढत आहे. वृक्षदिंडीच्या माध्यमातून पर्यावरणाची चळवळ गतीमान झाली. ग्रामीण व आदिवासी क्षेत्रात कार्य करणाºया विविध संस्था, महिला बचतगट आणि ग्रामपंचायतींचा सहभाग उल्लेखनीय ठरत आहे. राज्याचे वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतील ३३ कोटी वृक्ष लागवड मोहिम यशस्वी करण्यासाठी वन विभागासोबतच शासनाचे सर्व विभाग जोमाने कार्य करीत आहेत. त्यामुळे नागरिकांनाही प्रेरणा मिळाली आहे.