शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
4
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
5
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
6
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
7
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
8
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
9
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
10
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
11
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
12
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
13
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
14
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
15
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
16
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
17
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
18
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
19
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
20
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
Daily Top 2Weekly Top 5

१८ रुग्णांना गॅस्ट्रोची लागण

By admin | Updated: September 5, 2015 01:07 IST

खडसंगी प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत येणाऱ्या अमरपूरी भान्सुली येथे तीन दिवसांपासून ग्रामपंचातीच्या

ग्रामपंचायतीचा निष्काळजीपणा : अमरपुरी भान्सुलीत रुग्णांच्या संख्येत वाढखडसंगी : खडसंगी प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत येणाऱ्या अमरपूरी भान्सुली येथे तीन दिवसांपासून ग्रामपंचातीच्या सार्वजनिक विहिरीचे पाणी पिल्याने मोठ्या प्रमाणात गॅस्ट्रोची (अतिसार) लागण झाली असून आजपर्यंत १८ रुग्ण खडसंगी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र व उपजिल्हा रुग्णालय चिमूर येथे उपचार घेत आहेत. त्यामुळे गावातील नागरिकांत भितीचे वातावरण पसरले आहे. चिमूर पंचायत समितीअंतर्गत येणाऱ्या गटग्रामपंचायत अमरपुरी (भान्सुली) ची लोकसंख्या अंदाजे दोन हजारांच्या जवळपास आहे. गावामध्ये ग्रामीण पाणी पुरवठा योजनेची नळयोजना नसल्याने पूर्ण गावाला ग्रामपंचायतीच्या सार्वजनिक विहिरीच्या पाण्यावरच आपली तहान भागवावी लागते. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने विहिरीमध्ये ब्लिचींग पावडर टाकणे गरजेचे असते तर विहिरीच्या स्त्रोतामध्ये दुसऱ्या ठिकाणाचे दूषित पाणी येत तर नाही याची दक्षता स्थानिक ग्रामपंचायतीने घ्यायला हवी. मात्र मागील अनेक दिवसांपासून विहिरीत ब्लिचींग पावडर न टाकल्याने व बाजुला संडासचे गटर असल्याने या विहिरीचे पाणी दूषित झाल्याचा अंदाज गावकऱ्यांनी व्यक्त केला आहे.गेल्या तीन दिवसांपासून गॅस्ट्रोच्या आजाराच्या रुग्णांत वाढ होत आहे. अनिल देवराव घोगडे (३५), शिवाणी संपत नन्नावरे (४), सुहासिनी हरिदास जांभुळे हे रुग्ण खडसंगीच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार घेत आहेत. रेखा तुळशीराम श्रीरामे (३०), बाळू देवराव दडमल (३५), सुमन रामदास ताजने (५०), पीयूष तुळशिराम श्रीरामे (५), वंदना वामन घेताडे (४५), मंगेश महादेव दडमल (२५), अरुण कवडू श्रीरामे, किरण नन्नावरे (२५), मनिषा रविंद्र श्रीरामे (२०), मंजुळा महादेव दडमल (४५), लक्ष्मण सातपैसे (५०), विनोद सातपैसे (२५), प्रदीप गायकवाड (२१), वेदांत शांताराम ताजने (५०), आणि संगीता संदीप समर्थ यांचा समावेश आहे. हे सर्वजण अमरपुरी भान्सुलीचे रहिवासी आहे. त्यांच्यावर चिमूरच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आरोग्य विभागाने वेळीच दखल घेतली असती तर एवढे रुग्णांना गॅस्ट्रोची लागण झाली नसती. त्यामुळे याकरीता आरोग्य विभागाचा अलगर्जीपणा कारणीभूत असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे तर ग्रामपंचायतने पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोताजवळ स्वच्छता व ब्लिचींग पुरवठा वेळेवर केला असता तर गॅस्ट्रोची लागण झाली नसल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. (वार्ताहर)