शासकीय आश्रमशाळेतील प्रकार : विहिरीत साचला कचऱ्याचा ढिगशंकर मडावी देवाडा (राजुरा)आदिवासी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी सरकार लक्षावधी रुपयांचा खर्च करीत असले तरी यंत्रणांच्या उदासीनतेमुळे चांगल्या योजनांचा कसा बट्ट्याबोळ होतो, याची प्रचिती देवाडा येथील शासकीय पोस्ट बेसिक आश्रमशाळेत येत आहे. नियोजन करून हा प्रकल्प उभारण्यात न आल्याने लाखो रुपये खर्चूनही हा प्रकल्प निरर्थक ठरला आहे. राजुरा तालुक्यातील देवाडा येथील शासकीय पोस्ट बेसीक आदिवासी आश्रमशाळेत शासनाच्यावतीने विद्यार्थ्यांच्या सोईसाठी १८ लाख रुपये खर्च करून सौर उर्जा प्रकल्प उभारण्यात आला. मात्र हा प्रकल्प सध्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यात पडून आहे. प्रस्तुत प्रतिनिधीने सदर आश्रमशाळेला भेट दिली असता, हा गंभीर प्रकार उजेडात आला. यासोबतच या आश्रमशाळेत अनेक समस्या असून विद्यार्थ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. अधीक्षक आणि मुख्याध्यापकांचे अज्ञानदेवाडा येथील आश्रमशाळेत मुला-मुलींना राहण्याची व्यवस्था आहे. त्यांना आंघोळीसाठी गरम पाण्याची गरज असते. यासह विजेसंदर्भातील विविध गरजाही या प्रकल्पातून भागू शकतात, ही बाब लक्षात घेऊनच शासनाने या आश्रमशाळेत सौरऊर्जा प्रकल्प उभारला. हा प्रकल्प दोन भागात उभा आहे. मात्र या प्रकल्पाची अतिशय दुरवस्था झाली असून तो सध्या बंद अवस्थेत आहे. मुळातच वसतिगृह अधीक्षक व मुख्याध्यापकाच्या अज्ञानामुळे हा प्रकल्प चुकीच्या ठिकाणी उभारण्यात आला. कर्मचारी मद्याच्या आहारीयेथील जबाबदार कर्मचारी मद्याच्या आहारी गेले असून दारूच्या नशेत हे कर्मचारी विद्यार्थ्यांशी असभ्य वर्तन करीत असल्याच्या तक्रारी यापूर्वी विद्यार्थिनी केल्यानंतर पंचायत समिती सदस्य व सरपंचांनी वसतिगृह अधीक्षकांविरुद्ध प्रकल्प अधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. मात्र त्या तक्रारीची साधी चौकशीही करण्याचे धाडस अधिकाऱ्यांनी दाखविले नाही.आश्रमशाळेतील विहिरीचीही तीच अवस्थालाखो रुपये खर्च करून आश्रमशाळेत उभारण्यात आलेल्या विहिरीचीही तिच अवस्था झाली आहे. या विहिरीभोवती कचऱ्याचे ढिगारे उभे आहे. या विहिरीतील पाण्याचा वापरदेखील केला जात नसल्याचे वास्तव आहे. याप्रकाराकडे मात्र वसतिगृह प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. सदर विहिरीसभोवतालचा कचरा स्वच्छ केल्यास या विहिरीतील पाण्याचा वापर केला जाऊ शकतो.लाखो रुपयांचा निधी जातो कुठे? शासकीय वसतीगृहाच्या देखभाल दुरूस्तीसाठी शासनाकडून लाखो रुपयांचा निधी दिला जातो. मात्र या निधीचा उपयोग नेमका कशासाठी करण्यात येतो, ही बाब अद्यापही गुलदस्त्यात आहे. या निधीची चौकशी केल्यास मोठे गौडबंगाल उजेडात येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
१८ लाखांचे सौर ऊर्जा संयंत्र कचऱ्यात
By admin | Updated: April 28, 2015 01:23 IST