शहरं
Join us  
Trending Stories
1
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
2
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
3
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
4
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
5
महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
6
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
7
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
8
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
9
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
10
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
11
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
12
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
13
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
14
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
15
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
16
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
17
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
18
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
19
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
20
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
Daily Top 2Weekly Top 5

सहा वर्षात 2023 जणांना 18 कोटी 61 लाखांचे अर्थसहाय्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2021 05:00 IST

बल्लारपूर तालुक्यात सात हजारपेक्षा अधिक शेतकरी आहेत. विसापूर, बामणी, इटोली, मानोरा,पळसगाव, कोठारी, दहेली, कारवा या क्षेत्रात वन्य प्राण्यांचा वावर असल्यामुळे अतिशय संवेदनशील क्षेत्र मानले जाते. शहरी भागात बल्लारपूरचाही समावेश होतो. मागील सहा वर्षात बल्लारपूर वनपरिक्षेत्र कार्यालयाने बल्लारपूर तालुक्यातील शेतपिकांचे नुकसान, पशुधन हानी व मनुष्य हानी प्रकरणी १८ कोटी ६१ लाख ९ हजार ११४ रुपयांचे अर्थसहाय्य केले आहे.

मंगल जीवने लोकमत न्यूज नेटवर्कबल्लारपूर : वन आणि जीवन यांचे शहर आणि खेडे विभागात राहणाऱ्यांसाठी खूप निकटचे नाते आहे. वनांमुळे आपण आहोत, हे सर्वविदित आहे. पण काही वेळा वन्यप्राण्यांकडून नागरिकांवर हल्ले होतात. हे लक्षात घेऊन राज्य शासनाने वनाशेजारच्या वस्त्यांमधील नागरिकांवर हल्ला झाल्यास, वन्य प्राण्यांनी शेत पिकांचे नुकसान केल्यास, पशुधन हानी झाल्यास शासन त्यांच्या मदतीस धावून जाते व त्यांना नुकसान भरपाई देते. बल्लारपूर वनविभागाने सहा वर्षात २ हजार २३ जणांना १८ कोटी ६१ लाख ९ हजार ११४ रुपयांचे अर्थसहाय्य केले आहेबल्लारपूर तालुक्यात सात हजारपेक्षा अधिक शेतकरी आहेत. विसापूर, बामणी, इटोली, मानोरा,पळसगाव, कोठारी, दहेली, कारवा या क्षेत्रात वन्य प्राण्यांचा वावर असल्यामुळे अतिशय संवेदनशील क्षेत्र मानले जाते. शहरी भागात बल्लारपूरचाही समावेश होतो. मागील सहा वर्षात बल्लारपूर वनपरिक्षेत्र कार्यालयाने बल्लारपूर तालुक्यातील शेतपिकांचे नुकसान, पशुधन हानी व मनुष्य हानी प्रकरणी १८ कोटी ६१ लाख ९ हजार ११४ रुपयांचे अर्थसहाय्य केले आहे. बल्लारपूर तालुक्यात आठ महिन्यात शेतपीक, पशुधन हानी व मनुष्य हानी झालेल्या ६२ जणांना एक कोटी २९ लाख ४ हजार जणांना अर्थसहाय्य देण्यात आले.बल्लारपूर तालुक्यात मागील सहा वर्षात शेतपिकांचे नुकसान झालेल्या १ हजार ३९२ शेतकऱ्यांचे अर्ज वन खात्यास प्राप्त झाले, तर पशुधन हानी प्रकरणी ५८३ नागरिकांचे अर्ज मिळाले आणि मनुष्य हानी प्रकरणी ४८ खेडेगावातील नागरिकांचे निवेदन प्राप्त झाले. त्यानुसार तातडीने हे अर्ज शासनाकडे पाठविण्यात आले व मंजूर करण्यात आले, असे वन परिक्षेत्र अधिकारी संतोष थिपे यांनी सांगितले. 

तालुक्यातील वनव्याप्त भागातील शेतकऱ्यांना दरवर्षी वन्यप्राण्यांच्या हैदोसाचा सामना करावा लागतो. वन्यप्राण्यांकडून पिकांचे नुकसान होतेच, शिवाय अनेक शेतकरी  हल्ल्यामध्ये जखमीही होत असल्याच्या घटना बल्लारपूर तालुक्यात घडल्या आहेत. यावर वन खात्याने त्वरित लक्ष दिल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे. - सुमित डोहणे,सामाजिक कार्यकर्ता, बल्लारपूर  

घटनेची माहिती मिळताच त्या परिसरात वन खात्याचे अधिकारी पोहोचून त्यांना तत्काळ मदत करतात. मानोरा येथील मनुष्य हानीची वन खात्याने दखल घेऊन तत्काळ मदत केली. याशिवाय वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या व्यक्तींना औषधोपचारासाठी २० हजार रुपयांचे अर्थसहाय्य तत्काळ केले जाते.   -संतोष थिपे,वनपरिक्षेत्र अधिकारी, बल्लारपूर.

 

टॅग्स :forest departmentवनविभाग