शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

१४ अंगणवाडीचे बांधकाम अपूर्ण

By admin | Updated: July 22, 2014 23:55 IST

बालकांना चांगल्या वातावरणात ज्ञानार्जन करता यावे, या हेतूने मूल तालुक्यात पोषण आहार जिल्हा योजनेंतर्गत सन २०१०-११ या वर्षात आंगणवाडी बांधकामासाठी निधी मंजूर केला. मात्र प्रशासनाच्या

मूल : बालकांना चांगल्या वातावरणात ज्ञानार्जन करता यावे, या हेतूने मूल तालुक्यात पोषण आहार जिल्हा योजनेंतर्गत सन २०१०-११ या वर्षात आंगणवाडी बांधकामासाठी निधी मंजूर केला. मात्र प्रशासनाच्या दुर्लक्षितपणामुळे अंगणवाडींचे बांधकाम अपूर्ण आहे. सन २०१०-११ या वर्षात मंजूर २१ अंगणवाडी बांधकामापैकी सात आंगणवाडी बांधकामाचे काम सन २०१३-१४ या वर्षात पूर्ण करण्यात आले. मात्र उर्वरित १४ अंगणवाडीचे काम अपूर्ण अवस्थेत असल्याने बालकांच्या ज्ञानार्जनाचा प्रश्न उभा ठाकला आहे. पंचायत समिती मूल अंतर्गत येणाऱ्या १४ अपूर्ण असलेल्या आंगणवाडी बांधकामात भादुर्णी, डोंगरगाव, चितेगाव, टेकाडी, सादाग हेटी, ताडाळा, चिंचाळा, विरई, गडीसुर्ला, बेंबाळ, जुनासुर्ला, पिपरी दिक्षित, फिस्कुटी, नांदगाव या गावांचा समावेश आहे. पोषण आहार जिल्हा नियोजन अंतर्गत सन २०१०-११ या वर्षात अंगणवाडी बांधकामाचे ७० लाख रुपयांचे अंदाजपत्र करण्यात आले. त्यात शासनाने १२ लाख रुपयांपर्यंत निधी पंंचायत समिती मूलला वितरित केला. मात्र संवर्ग विकास अधिकारी व संबंधित कनिष्ठ अभियंंता यांच्या दुर्लक्षितपणामुळे बांधकाम करण्यास पाहिजे त्या प्रमाणात रस दाखविला नाही. त्यामुळे गेल्या दोन ते तीन वर्षांपासून लाखो रुपयांचा निधी धूळ खात पडला आहे. मंजूर २१ अंगणवाडीपैकी १४ आंगणवाडी बांधकाम अपूर्ण दिसत आहे. मंजूर झालेल्या वर्षात अंगणवाडी बांधकाम करण्यात आले असते तर लहान बालकांना त्याचा लाभ घेता आला असता, आजच्या स्थितीत जुन्या अंगणवाडी मोळकडीस आल्याने बालकांचे शिक्षण अपूर्ण राहत असल्याचे दिसून येते. जवळपास प्रत्येक आगणवाडी बांधकामास ३ लाख ५० हजार रुपयांचा निधी मंजूर केला आहे. निधी उपलब्ध असतानाही बांधकाम होऊ नये, याबाबत संताप व्यक्त केला जात आहे. (तालुका प्रतिनिधी)