शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
4
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
5
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
6
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
7
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
8
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
9
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
10
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
11
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
12
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
13
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
14
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
15
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
16
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
17
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
18
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
19
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
20
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
Daily Top 2Weekly Top 5

१२ हजारांवर कोतवालांना हवा हक्काचा पगार !

By admin | Updated: December 11, 2015 01:24 IST

इंग्रज काळापासून शेतकऱ्यांकडून महसूल गोळा करण्यात महत्वाची भूमिका बजावणारे राज्यातील १२ हजार ६३६ कोतवाल यंदाच्या हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने संघटित झाले आहेत.

बल्लारपूर/ नंदोरी: इंग्रज काळापासून शेतकऱ्यांकडून महसूल गोळा करण्यात महत्वाची भूमिका बजावणारे राज्यातील १२ हजार ६३६ कोतवाल यंदाच्या हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने संघटित झाले आहेत. आम्हाला पाच हजार रूपयांचे तुटपुंजे मानधन नको तर, चतुर्थ श्रेणी कर्मचारी म्हणून सन्मानपूर्वक शासनाच्या सेवेत सहभागी करा, अशी मागणी घेऊन राज्यभरातील कोतवाल नागपूरच्या विधानसभेवर पायदळ मोर्चाची धडक देणार आहेत. सरकारने मागणी ऐकली नाही तर जिथे अडविले तिथेच १६ डिसेंबरला ठिय्या देण्याचा निर्धारही राज्य कोतवाल संघटनेने व्यक्त केला आहे.महाराष्ट्र राज्य अस्तित्वात येण्याच्या आधीपासून कोतवालांची पदे आहेत. या कोतवालांकडे गावात दवंडी घालणे, शेतकऱ्यांकडून महसूल, शेतसारा गोळा करणे, सरकारच्या वतीने बजावण्यात येणाऱ्या नोटीस तामिल करणे, रेती घाट, गिट्ट-मूरूम खदाणींवर पाळत ठेवणे, गौण खनिजांची चोरी रोखणे, नैसर्गिक आपत्तीची माहिती प्रशासनाला कळविणे, तलाठी व मंडल स्तरावर सांगितली जाणारी कामे करणे अशा जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात. एका साझ्यामध्ये किमान सहा गावे असतात. त्यात एक तलाठी आणि एक कोतवाल असतो. या सर्व गावातील शेतकरी आणि महसूल विभाग यांच्या समन्वय राखणारा घटक म्हणून कोतवालांकडे पाहीले जाते. मात्र जबाबदाऱ्यांच्या तुलनेत त्यांना मिळणारे मानधन अल्प आहे. या अन्यायाच्या निषेधार्थ आणि मागणीसाठी राज्य कोतवाल संघटनेने १४ ते १६ डिसेंबर या काळात वर्धा ते नागपूर अशा पायदळ मोर्चाचे आयोजन केले आहे. १६ तारखेपर्यंत सरकारने निर्णय न घेतल्यास १६ डिसेंबरला विधानभवनासमोच बेमुदत ठिय्या देण्याचा त्यांचा निर्धार आहे.या मागण्यांसंदर्भात मंत्रीस्तरावर अनेकदा निवेदने देण्यात आली. काँग्रेसच्या काळात तत्कालिन आमदार सुधीत मुनगंटीवार यांनी कोतवालांची दखल घऊन त्यांचे मानधन अडीच हजारांवरून पाच हजारांवर करण्यासाठी पुढाकार घेतला होता. वित्तमंत्री झाल्यावर कोतवाल संघटनेने गतवर्षी सत्कार केला असता वर्षभर थांबण्याचे आश्वासन मिळाले होते. मात्र आता अर्थ मंत्रालय आणि महसूल मंत्रालयाकडून फाईलची टोलवाटोलवी सुरू असल्याचा अनुभव कोतवालांना येत आहे. (लोकमत चमू)