शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

राजुऱ्यात साकारणार १०० खाटांचे उपजिल्हा रुग्णालय

By admin | Updated: September 3, 2014 23:15 IST

चंद्रपूर जिल्हा औद्योगिक जिल्हा आहे. राजुरा, कोरपना तालुक्यात अनेक उद्योगही आहेत. त्यामुळे येथे १०० खाटांचे उपजिल्हा रुग्णाललय निर्माण व्हावे, अशी नागरिकांची मागणी होती. आमदार सुभाष धोटे

दिलासा : सुभाष धोटे यांच्या प्रयत्नांना यशचंद्रपूर : चंद्रपूर जिल्हा औद्योगिक जिल्हा आहे. राजुरा, कोरपना तालुक्यात अनेक उद्योगही आहेत. त्यामुळे येथे १०० खाटांचे उपजिल्हा रुग्णाललय निर्माण व्हावे, अशी नागरिकांची मागणी होती. आमदार सुभाष धोटे यांनी या मागणीचा शासन दरबारी सातत्याने पाठपुरावा करून उपजिल्हा रुग्णालयाला मंजुरी प्राप्त करून घेतली होती. ८ कोटी ४३ लाख ४६ हजार एवढ्या रकमेच्या अंदाजपत्रक व नकाशांना प्रशासकीय मान्यता देण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता. दरम्यान, महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने राजुरा येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या बांधकामासाठी आठ कोटी ४३ लाख ४६ हजार एवढ्या रकमेच्या प्रस्तावाला मंजुरी प्रदान केली आहे. त्यामुळे लवकरच १०० खाटांचे हे रुग्णालय नागरिकांच्या सेवेत येणार असल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे.उपजिल्हा रुग्णालयासाठी लागणाऱ्या आठ कोटी रुपयांच्या आर्थिक प्रस्तावास मान्यता दिल्याचे आरोग्य सेवा संचालनालयाचे १४ जानेवारी २०१४ रोजी निर्गमीत करण्यात आलेले पत्र नुकतेच २ सप्टेंबर २०१४ रोजी प्राप्त झाले असून लवकरच राजुरा येथे या उपजिल्हा रुग्णालयाचे बांधकाम सुरू होणार आहे. सदर उपजिल्हा रुग्णालय राजुरा येथे खेचून आणल्यात आमदार सुभाष धोटे यांनी शासन दरबारी पुर्ण ताकद लावली होती. त्यामुळेच १०० खाटांचे उपजिल्हा रुग्णालय राजुरा येथे साकार होत आहे. राजुरा विधानसभा क्षेत्र अतिदुर्गम व नक्षलग्रस्त असून या क्षेत्रात एकही १०० खाटांचे उपजिल्हा रुग्णालय नव्हते या उपजिल्हा रुग्णालयाच्या निर्मितीमुळे संबंधित कोरपना व जिवती तालुक्यातील रुग्णांनाही या उपजिल्हा रुग्णालयाचा लाभ मिळणार आहे. तसेच सीमेलगतच्या तेलंगाना राज्यातील अनेक गावातील अनेक रुग्ण थेट चंद्रपूरला उपचारासाठी जात असतात. त्यांंनाही आता राजुरा येथे उपचार घेण्याची संधी या रुग्णालयामुळे मिळणार आहे.राजुरा येथे १०० खाटांचे उपजिल्हा रुग्णालय निर्माण व्हावे, अशी या परिसरातील नगारिकांची अनेक दिवसांपासून मागणी होती. त्यामुळे आपल्या मतदार संघातील नागरिकांच्या आरोग्य सुदृढ राहावे, त्यांना योग्य वेळी योग्य उपचार मिळावा, छोट्या छोट्या व्याधीसाठी चंद्रपूरला जावे लागु नये, या बाबीचा विचार करुन आमदार सुभाष धोटे यांनी हा ज्वलंत प्रश्न शासनाकडे लावून धरला होता व अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले आहे. (नगर प्रतिनिधी)