शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धात उतरली महासत्ता! ऑपरेशन मिडनाइट हॅमर, इराणच्या ३ अणुतळांवर अमेरिकेचे १४ बॉम्ब
2
निम्म्या जगावर इंधनाचे संकट? इराण बंद करणार होर्मुझची सामुद्रधुनी; प्रस्ताव मंजूर
3
Pahalgam Attack: पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना आश्रय देणारे दोघे अटकेत
4
शरीरात लपविलेले २३ कोटींचे अमली पदार्थ जप्त; मुंबई विमानतळावर पाच जणांना अटक 
5
बघ्यांसमोर प्राण सोडला, मृतदेह २ तास रस्त्यावर; पोलिसांची विनंतीही धुडकावली
6
कोकणात आणखी सहा ग्रोथ सेंटर्स; १०६ गावांत विकास केंद्रे, पर्यटन, कृषी व्यवसायाला चालना   
7
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
8
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
9
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
10
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
11
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
12
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
13
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
14
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
15
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
16
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
17
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
18
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
19
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
20
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)

सीटीपीएसच्या कंत्राटदारावर १० टक्के दंडाची शिफारस

By admin | Updated: September 10, 2015 00:58 IST

चंद्रपूर वीज केंद्राच्या वॉटर टँक परिसरात सुरू असलेल्या सेटलिंक टँकच्या कामाचा कालावधी तीन महिन्यांचा असताना दीड वर्षांपासून काम पूर्ण करण्यात आलेले नाही.

शासकीय लेखा परीक्षकाची शिफारस : तीन महिन्याचे काम १९ महिने लोटूनही अपूर्णचंद्रपूर : चंद्रपूर वीज केंद्राच्या वॉटर टँक परिसरात सुरू असलेल्या सेटलिंक टँकच्या कामाचा कालावधी तीन महिन्यांचा असताना दीड वर्षांपासून काम पूर्ण करण्यात आलेले नाही. ते काम निकृष्ठ दर्जाचे असल्याचा ठपका ठेवत शासकीय लेखा परीक्षकाने कंत्राटदारावर मूळ किंमतीच्या १० टक्के दंड ठोठावण्यात यावा, अशी शिफारस महानिर्मितीकडे केली आहे.सेटलिंक टँकची मूळ किंमत ७० लाख रुपये आहे. २९ जानेवारी २०१४ ला तिरुपती कन्स्ट्रक्शनला वर्क आॅर्डर देण्यात आला. वर्कआॅर्डर मिळाल्यानंतर तीन महिन्यांच्या कालावधीत कंत्राटदाराला हे काम पूर्ण करून द्यावयाचे होते. मात्र, १९ महिने उलटूनही काम पूर्ण झालेले नाही. वीज केंद्राच्या वॉटर टँकमध्ये राखमिश्रीत पाणी जाऊ नये म्हणून सेटलिंक टँक तयार केली जात आहे. टाकाऊ पाण्यातून मोठ्या प्रमाणात राखमिश्रीत पाणी पॉवर हाऊसमध्ये जात असल्याची ओरड झाली होती. त्यामुळे सेटलिंक टँक निर्माण करण्याचा प्रस्ताव पुढे आला. सेटलिंक टँकद्वारे पाणी अडवून राख बाजूला करायची आणि पाणी पॉवरहाऊसकडे वळते करण्याची ही योजना आहे. लेखा परीक्षण विभागाने २०१४ मध्ये केलेल्या आॅडिटमध्ये या कामात मोठा गैरव्यवहार झाल्याची बाब पुढे आली. तिरुपती कन्स्ट्रक्शन कंपनीने सादर केलेल्या बिलांवरसुद्धा आक्षेप घेण्यात आला आहे. काम अपूर्ण असताना अवास्तव बिले जोडण्यात आली. तसेच कामाचा दर्जासुद्धा अत्यंत निकृष्ट आहे. त्यामुळे तिरुपती कन्स्ट्रक्शन कंपनीचे या कामाचे देयक अडवून ठेवण्यात आले आहे. या कामाचा निकृष्ट दर्जा आणि काम वेळेत पूर्ण करून न दिल्याने तिरुपती कन्स्ट्रक्शनवर १० टक्के दंड ठोठावण्यात यावा, अशी शिफारस लेखा परीक्षण विभागाने केली आहे. लेखा परीक्षण विभागाची ही शिफारस महानिर्मितीकडे गेल्या आठ महिन्यांपासून पडून आहे. मात्र, अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही. (स्थानिक प्रतिनिधी)