शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
2
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
3
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
4
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
5
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
6
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
7
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
8
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
9
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
10
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
11
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
12
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
13
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
14
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
15
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
16
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
17
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
18
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
19
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
20
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
Daily Top 2Weekly Top 5

१ कोटी ३८ लाख रुपये खर्चून होणार शाळांची स्वच्छता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:28 IST

साईनाथ कुचनकार चंद्रपूर : कोरोना संकटामुळे मागील दहा महिन्यांपासून शाळा बंद आहेत. दरम्यान, २७ जानेवारीपासून जिल्ह्यातील पाचवी ...

साईनाथ कुचनकार

चंद्रपूर : कोरोना संकटामुळे मागील दहा महिन्यांपासून शाळा बंद आहेत. दरम्यान, २७ जानेवारीपासून जिल्ह्यातील पाचवी ते आठवीच्या किमान ७५० शाळा सुरू होणार आहेत. त्यामुळे शाळा तसेच वर्गखोल्यांची स्वच्छता कशी करायची ही चिंता शिक्षकांना सतावत असतानाच राज्य शासनाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील शाळांच्या स्वच्छतेकरिता स्पेशल निधी म्हणून १ कोटी ३८ लाख ६५ हजार रुपये जिल्हा परिषदेला सुपुर्द केले आहेत. या माध्यमातून शाळांची स्वच्छता तसेच इतर खर्च केला जाणार आहे. त्यामुळे सध्या तरी शाळा स्वच्छतेची शिक्षकांची चिंता मिटली आहे.

नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग यापूर्वीच सुरू झाले आहेत. आता २७ जानेवारीपासून पाचवी ते आठवीपर्यंतचे वर्ग सुरू होणार आहेत. मात्र मागील अनेक महिन्यांपासून वर्गखोल्या बंद अवस्थेत असल्यामुळे त्या स्वच्छ करणे अत्यावश्यक आहे. शाळांची स्वच्छता करण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाला जबाबदारी सोपविण्यात आली आहे. मात्र जिल्ह्यातील बहुतांश ग्रामपंचायतींनी शाळा स्वच्छतेकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे शिक्षकांनाच हातात झाडू घेण्याची वेळ आली होती. मात्र राज्य शासनाने स्पेशल निधीमधील १ कोटी ३८ लाख ६५ हजार रुपयांची रक्कम जिल्हा परिषद प्रशासनाला पाठविली आहे. या निधीमधून शाळांची स्वच्छता, निर्जंतुकीकरण, हॅण्ड वाॅश, साबण आदी व्यवस्था करण्यात येणार आहे. त्यामुळे सध्या तरी शिक्षकांची शाळा स्वच्छतेची चिंता दूर झाली आहे.

कोट

शासनाने जिल्हा परिषद शाळांना सादील खर्चासाठी निधी पाठविला आहे. यातून शाळांची स्वच्छता तसेच इतर आवश्यक साहित्य खरेदी करण्यात येणार आहे. यामध्ये स्वच्छता, निर्जंतुकीकरण, हॅण्ड वाॅश, साबण आदींची व्यवस्था करण्याचे नियोजन आहे.

- दीपेंद्र लोखंडे,

शिक्षणाधिकारी, प्राथमिक जिल्हा परिषद चंद्रपूर

बाॅक्स

पालकांची घ्यावी लागणार संमती

५ ते ८ वीच्या शाळा सुरू होणार असल्या तरी शिक्षकांना विद्यार्थ्यांच्या पालकांची संमती घ्यावी लागणार आहे. यासाठी एक अर्ज भरून घ्यावा लागणार आहे. संमतीपत्राअभावी जे विद्यार्थी शाळेत येणार नाहीत त्यांच्यासाठी सध्या सुरू असलेले ऑनलाइन शिक्षण पुढेही सुरू राहणार आहे.

---

जिल्ह्यात एकूण विद्यार्थी

१ लाख २५ हजार ५६२