शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
2
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
3
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
4
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
5
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
6
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
7
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
8
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
9
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
10
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
11
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
12
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
13
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
14
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
15
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
16
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
17
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
18
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
19
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
Daily Top 2Weekly Top 5

फेसबुकवर आहात? - मग तपासा या 4 सवयी, त्या तुमचं करिअर नासवत तर नाही?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2017 15:50 IST

तुम्ही फेसबुक वापरुन आपल्या पायावर धोंडा पाडून घेणार की, नेटवर्किग करत स्वतःची इमेज सुधारणार हे तुमची प्रत्येक पोस्ट ठरवते. तेव्हा, जरा सावधान!

ठळक मुद्देआपण फार बोलतो, वाद घालतो, हमरीतुमरीवर येतो का? -तपासा.आपल्या प्रोफेशनल लाईफवर त्याचा वाईट परिणाम होऊ शकतो.

तुम्ही फेसबुवकर आहात? हा काय प्रश्न झाला, असतोच हल्ली प्रत्येकजण फेसबुकवर! करतोच टाइमपास, चालतेच भंकस! पण आपल्या लक्षातही येत नाही, फेसबुकर आपण जे जे लिहितो, पोस्ट करतो, शेअर करतो, त्या सार्‍यातून लोक आपली परीक्षाच करत असतात. आणि आपण जे अगाध  ज्ञान उधळतो, जो काय उद्धटपणा किंवा बालीशपणा करतो त्यातून आपल्याकडे पाहण्याची ‘नजर’ ही बदलू शकते. तुमच्या एखाद्या पोस्टचा किंवा कमेण्टचा भलताच अर्थ काढत लोकं तुमच्याविषयी बरीवाईट मतं बवनत असतात. मुख्य म्हणजे आभासी जगात हे सारं चालत असलं तरी मतं जी बनतात ती प्रत्यक्ष जगातही कायमच राहतात. हल्ली अनेक तरुण मुल फेसबुक वापरताना काही चुका हमखास करतात किंवा आपल्या नकळत  त्या होतील. त्या चूका कोणत्या, त्या टाळायच्या कशा, यावर एक नजर घालाच.

 

विरोधातली कॉमेण्ट मार डीलीट

काहीही लिहा, कितीही गंभीर असू द्या विषय काहीजण असे असतात तुमच्या पोस्टवर भंकसच करतात. तुम्हा टपली मारतात, विरोधाला विरोध करतात. काहीतरी पांचट कमेण्ट करतात. मुद्दाम तुम्हाला त्रास देतात. पोस्ट कशी तद्दन चुकीची आहे, तुमचा विचारच कसा मूर्खपणाचा आहे असं काहीजण असतात. काही मित्र तर विषय सोडून भलतंच काहीतरी बोलतात. आणि कधीकधी खरंच तुमच्या पोस्टवर कुणीतरी गांभीर्यानं टीका करत तुमच्या मुद्दाच खोडून काढतं. त्यावेळी काय करता तुम्ही? तावातावानं वाद घालता, शिवीगाळ करता, चिडून लिहिता, जातीय टिकाटिपणी करता, व्यंगावरुन शिव्या घालता, समोरच्याची औकात अकारण हुज्जत घालत बसता? हे सगळं इतर लोकं वाचतात तेव्हा काय मत होतं तुमच्याविषयी याचा विचार काही विचार केलाय? अशा वादग्रस्त मतांशी तुम्ही कशी डील करता, काय सभ्यतेनं वाद मिटवता, चूक मान्य करता, माघार घेता किंवा अत्यंत डिप्लोमॅटिक पद्धतीनं गोष्टी हाताळता हे सारं म्हणजे  तुमचे उत्तम प्रोफेशनल असण्याचे गुण. ते तुम्हाला जमलं तर तुम्हाला माणसं हाताळलं जमलं असं. समजा.

 

मला पहा, फुलं वाहा

सेल्फ ऑबसेशन म्हणतात याला. सतत मी-मी. मी अमुक खाल्लं. तमुक खाल्लं, अमुक सिनेमा पाहिला, तो बकवास आहे, मला तमका रंग आवडतो, ढमुकच मी केलं. मी श्वास घेतला आणि सोडला एवढंच लिहायचं काही लोकं बाकी ठेवतात. फक्त स्वतर्‍विषयी बोलतात. स्वतर्‍चेच अनुभव सांगतात. स्वतर्‍ची अखंड जाहिरात करत राहतात. दुसर्‍यांच्या पोस्टवर जाऊनसुद्धा कमेण्टमध्ये मी-मी करत राहतात. हे असं सतत मला पहा, फुलं वाहा. असं पाहून लोकं कंटाळतात. ‘मी-मी’ करणार्‍यांची आत्मप्रौढी इतरांना इरीटेट करते. हळूहळू लोक त्यांना टाळतात तरी किंवा मग अशी माणसं फक्त इतरांच्या गॉसिपचा आणि मनोरंजनाचा विषय ठरतात. विशेषतर्‍ जे तरुण प्रोफेशनल नेटवर्किगसाठी फेसबुक वापरतात निदान त्यांनी तरी हे असं ‘आत्मगान’ टाळायलाच हवं.

 

वॉच युवर क्लॉक

सगळ्यांत महत्त्वाचं, आपण किती थोर, आपल्याला काय काय येतं, पण त्यासाठी आपण खरंच हॅपनिंग असायला हवं. रात्रंदिवस फेसबुकवर राहून तुम्ही ते कसं जमवणार? त्यापेक्षा आपलं काम पूर्ण फोकस्ड करा, दिवसाकाठी फार तर अर्धातास टाइमपास आणि नेटवर्किग साठी द्या. याहून जास्त वेळ दिला तर आपल्या कामावर आपल्याही नकळत परिणाम होतोच.

 

किती बकबक कराल?

काहीजण सतत काही ना काही पोस्ट करतच असतात. इतकं की कधीही फेसबुकवर जा, तेच दिसतात. ते आवारा, कण्ट्रोल करा तुमचं दिसणं आणि व्यक्त होणं. तरच तिथंही तुमच्या शब्दाला काहीतरी मान राहील. नाही तर काय लोक म्हणतात, आहेच सुरु बकबक.