शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
2
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
3
निवडणूक आयोगाने आधारहीन म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, स्पष्टीकरणासह त्या दाव्यातील हवाच काढली
4
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
5
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
6
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
7
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
8
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
9
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
10
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी
11
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
12
सरकारी कर्मचारी-पेन्शनधारकांची दिवाळी होणार गोड! किती वाढणार पगार? मोठी अपडेट समोर
13
बेपत्ता महिला कॉन्स्टेबलची हत्या, कारमध्ये मृतदेह लपवला; आरोपी पोलिसाने सत्य सांगताच अधिकारी हैराण
14
Pune Firing: दुचाकीला साईड न दिल्याचे किरकोळ कारण; कोथरूड परिसरात निलेश घायवळ टोळीकडून गोळीबार, एक गंभीर जखमी
15
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
16
'ऑपरेशन ३१३'चा भांडाफोड! ३००हून अधिक मदरसा कॅम्प बांधण्याची तयारी होती सुरू, जैशचा मोठा कट उघडकीस
17
सासऱ्याच्या मृत्यूनंतर सून ढसाढसा रडली, संशय येताच पोलखोल झाली; 'ते' सत्य लपवण्यासाठी...
18
महाराष्ट्रातील या मतदारसंघात झाली मतचोरी, हजारो मतदार वाढले, राहुल गांधींचा पुराव्यानिशी सनसनाटी आरोप 
19
सेफ्टीमध्ये 'TATA'च एक नंबर, सलग नवव्या गाडीला मिळालं 5 स्टार रेटिंग; कोणती आहे कार?
20
जगातील सर्वात महान कर्णधार कोण? किरॉन पोलार्डनं 'या' दिग्गजाचं घेतलं नाव!

NCERT मध्ये नोकरीची संधी, 292 पदांसाठी भरती, 1.44 लाखपर्यंत सॅलरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2022 16:42 IST

NCERT Recruitment : NCERT कडून जारी केलेल्या या रिक्त पदासाठी अर्ज प्रक्रिया 8 ऑक्टोबर 2022 पासून सुरू झाली आहे.

नवी दिल्ली : नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशन रिसर्च अँड ट्रेनिंग (NCERT) मध्ये सरकारी नोकरी मिळवण्याची मोठी संधी आहे. NCERT द्वारे प्राध्यापक, ग्रंथपाल, सहाय्यक प्राध्यापक आणि सहयोगी प्राध्यापक पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. जारी करण्यात आलेल्या अधिसूचनेनुसार, एकूण 292 पदांची भरती केली जाणार आहे. त्यामुळे ज्या उमेदवारांना या पदांसाठी अर्ज करायचा आहे, ते  NCERT Recruitment च्या अधिकृत वेबसाइट ncert.nic.in वर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात.

NCERT कडून जारी केलेल्या या रिक्त पदासाठी अर्ज प्रक्रिया 8 ऑक्टोबर 2022 पासून सुरू झाली आहे. या रिक्त पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 ऑक्टोबर 2022 पर्यंत देण्यात आली आहे. यामध्ये प्राध्यापकाच्या 40, सहयोगी प्राध्यापकाच्या 97 आणि सहाय्यक प्राध्यापकाच्या 155 जागांसाठी भरती होणार आहे. अर्ज करण्यासाठी तुम्हाला खालील स्टेप्स फॉलो कराव्या लागतील.

NCERT Vacancy साठी असा करा अर्जस्टेप 1-  अर्ज करण्यासाठई सर्वात आधी अधिकृत वेबसाइट ncert.nic.in ला भेट घ्या.स्टेप 2- वेबसाइटच्या होम पेजवर Latest Updates च्या लिंकवर क्लिक करा.स्टेप 3 - यानंतर  Advertisement for filling up of 292 Faculty Positions च्या लिंकवर जा.स्टेप 4 - आता Apply Online Now च्या ऑप्शनवर क्लिक करा.स्टेप 5 - त्यानंतर पेज सांगण्यात आलेले डिटेल्स भरून रजिस्टेशन करा.स्टेप 6 -  रजिस्ट्रेशननतंर अॅप्लिकेशन फॉर्म भरा.स्टेप 7 - यानंतर फी जमा करून अर्ज प्रक्रिया पूर्ण करा.स्टेप 8 - अर्जाची प्रिट आवश्यक करा.

अर्ज शुल्कफी जमा केल्यानंतरच या रिक्त पदावरील अर्ज प्रक्रिया पूर्ण केली जाईल. यामध्ये अर्ज करणाऱ्या जनरल, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस प्रवर्गातील उमेदवारांसाठी अर्ज शुल्क 1000 रुपये ठेवण्यात आले आहे. त्याचवेळी, महिला, एससी, एसटी आणि पीएच कॅटगरीतील उमेदवारांसाठी कोणतेही शुल्क नाही. तसेच, अर्ज करण्यापूर्वी वेबसाइटवर जा आणि अधिसूचना तपासा.

शैक्षणिक पात्रताया रिक्त पदांद्वारे विविध विषयातील प्राध्यापक, सहायक प्राध्यापक आणि सहयोगी प्राध्यापक या पदांवर भरती होणार आहे.प्राध्यापक पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी असणे आवश्यक आहे. याशिवाय पीएचडी पदवी आणि 10 वर्षांचा अध्यापनाचा अनुभव असणे अनिवार्य आहे. दुसरीकडे, सहायक प्राध्यापक पदावंर अर्ज करणाऱ्या उमेदवारांना  UGC NET, SLET किंवा SET उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे. यामध्ये  M.Phil होल्डर सुद्धा अर्ज करू शकतात. तर सहयोगी प्राध्यापक पदासांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांजवळ  PhD ची डिग्री आणि संबंधित विषयात पीडी डिग्री असणे आवश्यक आहे. यासंबंधी अधिक माहितीसाठी अधिकृत अधिसूचना तपासू शकतात. 

टॅग्स :jobनोकरीCareer Guidanceकरिअर मार्गदर्शन