शहरं
Join us  
Trending Stories
1
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
2
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
3
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
4
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
5
होर्मुझमध्ये अमेरिकेचा 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
6
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
7
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
8
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
9
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
10
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
11
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
12
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
13
बंद घराची कौले काढून चोरी; दहा तोळे सोने व १७ हजारांची रोकड लंपास!
14
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
15
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
17
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
18
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
19
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
20
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

येळगाव धरण तहानलेलेच!

By admin | Updated: July 21, 2016 00:53 IST

बुलडाणा जिल्ह्यात संततधार पावसानंतरही फक्त तीन दशलक्ष घनमीटर जलसाठा संग्रहीत झाला.

हर्षनंदन वाघ / बुलडाणा तालुक्यातील येळगाव धरणात फक्त २५ टक्के जलसाठा असून, बुलडाणा शहरवासीयांची तहान भागविणारे हे धरण मात्र मागील आठवड्यात संततधार पावसानंतही तहानलेलेच आहे. पावसाळा सुरू होऊन जवळपास दीड महिना झाल्यानंतर येळगाव धरणात तीन द.ल.घ.मी जलसाठा असून, येणार्‍या उन्हाळ्यात पाणीटंचाई जाणवू नये म्हणून दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. यावर्षी पावसाळा सुरू होऊन दीड महिन्याचा कालावधी लोटल्यानंतरही बुलडाणा तालुक्यात आजपर्यंत ३२६ मि.मी. पाऊस झाला आहे. मागील आठवड्यात दोन दिवस संततधार पाऊस झाल्यामुळे येळगाव धरणात मोठय़ा प्रमाणात जलसाठा येईल, अशी अपेक्षा होती. मात्र झालेला पावसामुळे फक्त जमिनीची तहान भागली. मात्र येळगाव धरण तहानलेलेच राहिले. या धरणाद्वारे बुलडाणा शहर व परिसरातील काही ग्रामीण भागात नगरपालिकेद्वारे ८0 हजार लोकसंख्येच्या वस्तीला पाणीपुरवठा करण्यात येतो. यासाठी शहर परिसरातील येळगाव धरणातून जलशुद्धीकरण केंद्र व या केंद्रातून शहरातील जलकुंभात पाणी येते. या जलकुंभातून शहर परिसरात चौथ्या व पाचव्या दिवशी पाणीपुरवठा करण्यात येत आहे. गत काही वर्षापूर्वी कमी पर्जन्यमानामुळे येळगाव धरणात जलसाठा कमी प्रमाणात होता. परिणामी नागरिकांना उन्हाळ्य़ाच्या शेवटी पाण्यासाठी वणवण भटकावे लागत होते. मात्र, मागील वर्षापासून परिस्थिती बदलली होती. मागील वर्षी झालेल्या पावसामुळे धरण १00 टक्के भरले होते. त्यामुळे गेल्या उन्हाळ्यात पाणीटंचाई जाणवली नाही. आतासुद्धा शहरात चार दिवसाआड मुबलक प्रमाणात पाणी येत आहे. मात्र, येत्या उन्हाळ्यात पाणीटंचाई जाणवू नये म्हणून येळगाव धरणात मुबलक प्रमाणात जलसाठा होणे आवश्यक आहे. या धरण परिसरात दमदार पावसाची अपेक्षा व्यक्त होत आहे.