शहरं
Join us  
Trending Stories
1
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
2
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
3
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
4
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
7
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
8
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
9
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
10
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
11
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
12
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
13
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
14
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
15
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
IPL 2026: कोलकाताच्या तोंडातून विजयी घास हिसकावला; मुकुल चौधरीची फलंदाजी पाहून ऋषभ पंत गेला भारावून!
17
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
18
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
19
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
20
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

१४0 गाव पाणी पुरवठा योजनेचे काम गतिमान

By admin | Updated: August 1, 2014 02:22 IST

जळगाव शहरालाही मिळणार दिलासा : दोन महिन्यात २0 किमी जलवाहिनी पूर्ण.

जळगाव जामोद : खारपाणपद्दय़ाच्या व किडनीग्रस्त रुग्णांच्या पृष्ठभूमीवर जळगाव जामोद शहरासह दोन तालुक्यातील १४0 गावांसाठी मंजूर झालेल्या दोनशे बावीस कोटी तेवीस लाखाच्या पाणीपुरवठा योजनेच्या कामाला वेगाने सुरुवात झाली आहे. अवघ्या दोन महिन्यात संग्रामपूर तालुक्यातील २0 किमीची पाईप लाईन टाकण्याची प्रक्रिया पूर्ण झाली असून, असेच वेगाने काम सुरू राहिल्यास दोन वर्षात पूर्ण करावयाची ही योजना दीड वर्षातच कार्यान्वित होईल. विशेष म्हणजे पुढील ३0 वर्षांच्या लोकसंख्येचा विचार करून या योजनेचा आराखडा तयार करण्यात आला आल्यामुळे या योजनेतून नागरिकांनासुद्धा मुबलक पाणी पुरवठा होणार असल्याचे दिसून येते.जळगाव व संग्रामपूर तालुका हा खारपाणपट्टय़ात मोडतो. गत काही वर्षांपूर्वी या भागातील नागरिकांना दूषित पाण्याच्या सेवनाने किडनीसारख्या दुर्धर आजाराने ग्रासले आहे. शेकडो नागरिकांना किडनीच्या आजाराने आपले प्राण गमवावे लागले. परिणामी अनेक कुटुंबे उघड्यावर पडली. या सर्व प्रश्नावर एकच उपाय होता आणि तो म्हणजे या दोन्ही तालुक्यातील नागरिकांना पिण्याच्या शुद्ध पाण्याची व्यवस्था करणे. याचे गांभीर्य आ.डॉ. संजय कुटे यांनी नऊ वर्षांपूर्वीच ओळखले आणि विविध संवैधानिक आयुधे वापरून हा प्रश्न शासन दरबारी लावून धरला. त्यामुळे या प्रश्नाची तीव्रता शासनाच्या लक्षात आल्यानंतर लोकवर्गणीचा विषय बाजूला सारत शासनाने वाण धरणावरून जळगाव शहरासह १४0 गावांच्या योजनेला २ डिसेंबर १३ रोजी प्रशासकीय मान्यता दिली आणि लोकसभेची आचारसंहिता लागण्यापूर्वी ४ मार्च १४ ला या योजनेवर निधी वर्ग करीत वर्क ऑर्डर देण्यात आली. द इंडियन स्युम पाईप लिमिटेड मुंबई या सक्षम कंपनीने २0 मे १४ पासून या योजनेच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात करुन अवघ्या दोन महिन्यात २0 किमीच्या पाईपलाईनचे काम पूर्ण केले आहे. ही योजना अत्याधुनिक पद्धतीची राहणार आहे. या योजनेसाठी अति उच्च प्रतीचे एचडीपीईचे पाईप्स वापरण्यात येत आहेत. तसेच या योजनेंतर्गत वान धरणाच्या बाजूला एक जलशुद्धीकरण केंद्राची उभारणीही करण्यात येणार आहे. स्कॉडा अँन्ड अँटोमायझेशन या पद्धतीने या योजनेच्या पाणीपुरवठय़ाचे नियंत्रण होणार आहे. म्हणजेच कुठे किती पाणीपुरवठा झाला, प्रत्येक ठिकाणी किती पाण्याची आवश्यकता आहे, कुठे किती कमी व जास्त पाणी पोहचेल तसेच नळयोजनेचा कोणता भाग नादुरुस्त आहे, आदी सर्व बाबी इंटरनेटच्या माध्यमातून संगणकावर कार्यालयातच दिसणार आहे.