शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
5
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
6
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
7
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
8
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
9
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
10
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
11
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
12
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
13
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
14
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
15
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
16
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
17
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
18
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
19
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
20
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
Daily Top 2Weekly Top 5

महिलांनी दुधाने आंघोळ करून केला सरकारचा निषेध!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2017 00:51 IST

मोताळा: संपूर्ण कर्जमाफी करण्यात यावी, यासह विविध मागण्यांसाठी राज्यभरात १ जूनपासून शेतकरी संपावर असून, दुसऱ्या दिवशी शेतकरी संपाचे पडसाद मोताळा तालुक्यातही उमटले.

मोताळा: संपूर्ण कर्जमाफी करण्यात यावी, यासह विविध मागण्यांसाठी राज्यभरात १ जूनपासून शेतकरी संपावर असून, दुसऱ्या दिवशी शेतकरी संपाचे पडसाद मोताळा तालुक्यातही उमटले. खरबडी गावात शेतकरी महिलांनी दुधाने आंघोळ घालून तर आडविहीर गावात रस्त्यावर दूध ओतून शेतकरी संपाला पाठिंबा देण्यात आला.सरकारकडून संपूर्ण कर्जमाफीसह विविध मागण्यांची घोषणा होत नसल्याने बुधवारी मध्यरात्रीपासून राज्यभरातील शेतकऱ्यांनी संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. ठिकठिकाणी संपाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, पहिल्या दिवशी मोताळा तालुक्यात संपाबाबत अनभिज्ञता दिसून आली; मात्र शुक्रवारी तालुक्यातील खरबडी गावात सकाळी दूध उत्पादक शेतकरी व महिला एकत्र जमा झाले. यावेळी सरपंच मयूर किनगे, पांडुरंग किनगे, दगडाबाई वाकोडे, निर्मल सोळंके, शोभा किनगे, आशाबाई वाकोडे, उषा निकाळजे, रंजना किनगे, नवलसिंग सोळंके, नितीन राणे, विजय किनगे, राजेंद्र पाटील, भीमराव इंगळे, श्रीकृष्ण किनगेंसह मोठया संख्येत उपस्थित महिला व पुरूष शेतकऱ्यांनी शेकडो लिटर दूध रस्त्यावर फेकून दिले, तर महिलांनी दुधाने आंघोळ करून शासनाप्रति आपला रोष व्यक्त करत शेतकरी संपाला पाठिंबा दिला. आडविहिरी गावातील दूध उत्पादकांसह अन्य शेतकऱ्यांनी शुक्रवारी सकाळी मोताळा-नांदुरा मार्गावर येऊन हजारो लिटर दूध रस्त्यावर ओतून शेतकरी संपाला पाठिंबा दिला. यावेळी राजेंद्र पाटील, हरिभाऊ खर्चे, ओंकार कोलते, एकनाथ खर्चे, सुरेश जावळे, सुनील खर्चे, पुरूषोत्तम नाफडे, किशोर खर्चे, शंकर सोनुने, नितीन खर्चे, चंद्रकांत बंडे, छगन साबे, रमेश फाटे, राहुल जावळे, अंकु श बंडे, नीलेश सपकाळ आदी शेतकरी आंदोलनात सहभागी झाले होते.