शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
4
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
5
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
6
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
7
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
8
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
9
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
10
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
11
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
12
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
13
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
14
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
15
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
16
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
17
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
18
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
19
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
20
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
Daily Top 2Weekly Top 5

कुठे दुबार तर कुठे तिबार पेरणी

By admin | Updated: August 1, 2014 02:20 IST

मेहकर तालुक्यातील परिस्थिती पेरणी उलटल्याने शेतकरी हवालदिल

मेहकर : तालुक्यात तब्बल दीड महिन्याच्या प्रतीक्षेनंतर दमदार पावसाने हजेरी लावली; मात्र बियाणे खराब निघल्याने, तर काही ठिकाणी मृग नक्षत्राच्या सुरुवातीस पेरणी केल्याने तालुक्यातील पेरण्या उलटल्या आहेत. तालुक्यात सद्य:स्थितीत कुठे दुबार तर कुठे तिबार पेरणी करावी लागत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.मृग नक्षत्राच्या सुरुवातीस काही शेतकर्‍यांनी धूळ पेरणी केली होती; परंतु पावसाच्या हुलकावणीमुळे ती धूळ पेरणी धुळीतच गेली. तालुक्यात १ ते २ पावसावरच काही शेतकर्‍यांनी खरीप हंगामाची पेरणी केली. त्यानंतर पावसाने दडी मारल्यामुळे शेतकर्‍यांनी पिकास पाणी देण्यास सुरुवात केली; परंतु ते पाणी शेतीस कमी पडत असल्याने शेतात उभी असलेली पिकेही वाळायला लागली. त्यामुळे बहुतांश शेतकर्‍यांच्या पेरण्या उलटल्या. त्यानंतर चातकाप्रमाणे शेतकर्‍यांना पावसाची वाट पाहावी लागली. पावसासाठी येथील शेतकर्‍यांनी मशीदमध्ये प्रार्थना केली. तर अनेक मंदिरांवर वरुणराजाला साकडेही घालण्यात आले. जुलै महिन्याच्या शेवटी दमदार पावसाने हजेरी लावली. या पावसाने शेतकर्‍यांमध्ये आनंदाचे वातवरण निर्माण झाले असून, त्यांनी खरीप हंगामाच्या पेरणीस सुरुवात केली. परंतु बियाणे खराब निघल्यामुळे अनेक शेतकर्‍यांच्या खरीप हंगामाच्या पेरण्या उलटल्या असून, त्यांना आता दुबार पेरणी करावी लागत आहे. तर काही शेतकर्‍यांना तिबार पेरणीही करावी लागत असल्याने शेतकरी सध्या आर्थिक संकटात सापडला आहे. या दुबार व तिबार पेरणी होणार्‍या शेतांचे सर्वेक्षण करण्याची मागणी शेतकर्‍यांमधून जोर धरत आहे.