शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

भाजपचे नेते राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांकडे जातात तेव्हा..!!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:39 IST

सिंदखेडराजा : भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यक्रमानिमित्त राज्याचे माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील, सरचिटणीस राहुल ...

सिंदखेडराजा : भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यक्रमानिमित्त राज्याचे माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील, सरचिटणीस राहुल लोणीकर, विनोद वाघ हे आज सिंदखेडराजात आले होते. पालकमंत्र्यांचे विश्वासू राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष राजेंद्र अंभोरे यांची भेट भाजप नेत्यांनी घेतल्याने चर्चेचा विषय ठरला़

विविध कार्यक्रम आटोपून भाजप नेत्यांना देऊळगावराजाकडे जायचे हाेते़ त्यामुळे देऊळगावराजा रस्त्यावरील युवा वॉरिअर्स शाखेचा उद्घाटन सोहळा जो कार्यक्रमात आधी होणार होता तो परतीच्या प्रवासात जाताना करण्याचा निर्णय नेत्यांनी घेतला़ शाखा उद्घाटन झाल्यानंतर..नेत्यांचा हा ताफा देऊळगावराजाकडे निघणार...तितक्यात... राहुल लोणीकर यांच्याकडे एक निरोप आला आणि बावनकुळे लगेच गाडीच्या खाली उतरले...आणि पायीच निघाले...बावनकुळे आणि अन्य भाजपा नेते कुठे जाताहेत याची चर्चा सुरू असतानाच त्यांनी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष राजेंद्र अंभोरे यांचे घर गाठले. भाजपचे नेते राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांकडे का जाताहेत याची बाहेर चांगलीच चर्चा होती...अंभोरे यांच्याकडे हे सर्व नेते पोहोचले..उत्सुकता म्हणून काही पत्रकारही येथे उपस्थित होते. राजेंद्र अंभोरे हे पालकमंत्री ना़ डाॅ़ शिंगणे यांचे विश्वासू ...आणि अचानक त्यांच्याकडे भाजपचे नेते गेल्याने हा चर्चेचा विषय झाला.

भाजपा कार्यकर्त्यांना अंभोरे भाजपात प्रवेश करणार असेही क्षणभर वाटले.. पण ही भेट केवळ पारिवारिक होती...भाजपचे राहुल लोणीकर आणि अंभोरे परिवाराचे कौटुंबिक संबंध आहेत़ राहुल लोणीकर यांना अंभोरे यांनी घरी येण्याचे निमंत्रण आधीच दिले होते.त्यामुळे शाखा उद्घाटन होताच लोणीकर तिकडे जाणार होते...लोणीकर कुठे जाताहेत याची माहिती त्यांनी भाजपा प्रवक्ते विनोद वाघ यांना दिली.त्याच वेळी तिथे बावनकुळे हजार होते.त्यामुळे लोणीकर यांना आपण कुठे जात आहोत हे बावनकुळे यांना सांगावे लागले..चला मी पण येतो असे सहज म्हणून बावनकुळेदेखील गाडीच्या खाली उतरले आणि भाजपा नेत्यांचा हा ताफा जवळच असलेल्या अंभोरे यांच्या घरी पोहचला. त्यानंतर ही मंडळी पुढच्या प्रवासाला निघून गेली़