लोकमत न्यूज नेटवर्कदेऊळगाव राजा : शहरात सन २०१७ चा वर्षायोग (चतुर्मास) साजरा करण्याकरिता श्रमणमुनीश्री १०८ विशेषसागर महाराज यांचे जालना रोडवरील देऊळगाव राजा हायस्कूल येथे स्वागत करण्यात आले. यावेळी आ. डॉ. शशिकांत खेडेकर व डॉ. रामदास शिंदे यांनी स्वागत केले. श्री बालाजी महाराजांच्या या पुण्य नगरीत यावर्षीचा वर्षायोग भक्तिमय वातावरणात साजरा होत आहे. यावेळी देऊळगाव राजा शाळेच्या बँड पथकाने सलामी देत गुलाबपुष्प मुनीश्रींच्या चरणी अर्पण केले.
जैन मुनी विशेषसागर महाराज यांचे स्वागत
By admin | Updated: July 2, 2017 09:08 IST