शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

बुधवारी १० हजार जणांना मिळाला दुसरा डोस,  ९० हजार जणांना प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 10:54 IST

Buldhana News : तथापी, अजुनही ९० हजार लाभार्थी दुसऱ्या डोसच्या  प्रतीक्षेत आहेत.

- नीलेश जोशीलोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : गत अनेक दिवसांपासून प्रतिक्षेत असलेल्या तब्बल १० हजारावर लाभार्थ्यांना बुधवारी कोरोना प्रतिबंधक लसीचा दुसरा डोस मिळाला. तथापी, अजुनही ९० हजार लाभार्थी दुसऱ्या डोसच्या  प्रतीक्षेत आहेत.राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार जिल्ह्यातील १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाची मोहीम स्थगित करण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील दुसऱ्या डोसच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांना प्राधान्य क्रमाने आता लस मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. जिल्ह्यात जवळपास एक लाख नागरिकांना दुसऱ्या डोसची प्रतीक्षा आहे. मुळातच लसीचा पुरवठाच कमी होत असल्याने जिल्ह्यातील १०२ पैकी सुरू असलेल्या ९५ लसीकरण केंद्रांवर लसीचे डोस पोहोचवण्याची कसरत आरोग्य प्रशासनास करावी लागत आहे. त्यामुळे आता दुसऱ्या डोसला प्राधान्य देताना लसीकरण केंद्रांवर गोंधळ होणार नाही, याची खबरदारी घ्यावी लागणार आहे. जिल्ह्यास आतापर्यंत ३ लाख १५ हजार ९६९ लसीचे डोस उपलब्ध झालेले आहेत. त्यापैकी २ लाख ५२ हजार ३६३ जणांना लसीचा पहिला डोस देण्यात आला तर ६३ हजार ५९६ जणांना लसीचा दुसरा डोस देण्यात आला आहे. त्यामुळे दुसरा डोस देण्याचा वेग मंद आहे. त्यातच राज्यात लसीचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे लसीकरण मोहिमेला धक्का लागला आहे. परिणामी उपलब्ध असलेले डोस हे प्राधान्य क्रमाने ज्यांचा पहिला डोस झालेला आहे व दुसरा डोस देण्याची वेळ आलेली आहे, अशा व्यक्तींना ते देण्यात येणार आहे. त्यादृष्टीने जिल्हा परिषदेच्या लसीकरण विभागाने आता सज्जता सुरू केली आहे. बुधवारी १० हजार ४९१ जणांना लसीचा दुसरा डोस देण्यात आला. यावरून ही बाब स्पष्ट होते.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसbuldhanaबुलडाणा