शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

जल पुनर्भरण कागदावरच!

By admin | Updated: July 2, 2016 01:11 IST

लोणार नगरपालिकेचे होते दुर्लक्ष : पावसाचे पाणी जाते वाहून!

लोणार (जि. बुलडाणा) : नवीन बांधकामांना परवानगी देताना जल पुनर्भरण करणे आवश्यक आहे. त्याशिवाय नवीन बांधकामांना पालिकेने परवानगीच देऊ नये, असा सक्त नियम असताना लोणार पालिकेचे याकडे सर्रास दुर्लक्ष होत असून, परिणामी पावसाचे पडलेले पाणी वाहून जाते. नवीन बांधकाम करताना प्रत्येक मालमत्ताधारकांना जलपूनर्भरण करणे बंधनकारक करण्यात आले आहे. लोणार शहरात जलपुनर्भरण करणार्‍यांची संख्या अगदी बोटावर मोजण्याइतकीच आहे. परिणामी वर्षभर पाण्याचा वारेमाप वापर करणार्‍या नागरिकांकडून पाण्याची कुठलीच बचत होत नाही. लोणार नगरपालिकेच्या हद्दीत ५ हजार ४0३ मालमत्ताधारकांची संख्या आहे. तथापि शहरात जल पुनर्भरण करणार्‍या मालमत्ताधारकांची आकडेवारी एक टक्कासुद्धा नाही. शहरात पाणीपुरवठा करणार्‍या धरणातील पाणी साठा झपाट्याने कमी झाल्याने यावर्षी शहराला १00 दिवसानंतर पाणीपुरवठा झाला नाही. त्यामुळे शहरवासीयांना पाण्यासाठी भटकंती करावी लागली. शहरात पिण्याच्या पाण्याचा यावर्षी गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. यावर्षी शहरासह जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आल्याने जल पुनर्भरणाचा विषय समोर आला. त्यामुळे शासनाने जलयुक्त शिवारसारख्या योजना राबविण्यावर भर दिला. तर १ जुलै रोजी दोन कोटी वृक्ष लागवडीचा प्रकल्प शासनाने हाती घेतल्यामुळे जिल्हाभरातील लाखो नागरिकांनी वृक्ष लागवड केली. मात्र पालिका जल पुनर्भरण न करणार्‍या लोकांना का पाठीशी घालते, हा प्रश्नच आहे. ..तर अधिकारी व मालमत्ताधारक जबाबदारएकीकडे शासन ह्यपाणी आडवा पाणी जिरवाह्ण योजना वेगवेगळ्या माध्यमातून राबवित असताना नगरपालिका मात्र जल पुनर्भरणसारख्या उपक्रमाकडे दुर्लक्ष करीत आहे. भविष्यात ज्या मालमत्ताधारकांनी आपल्या बांधकामावर जल पुनर्भरण केले नाही, अशा व्यक्तीला व त्याच्या बांधकामाला परवानगी देणार्‍या पालिकेच्या अधिकार्‍याला जबाबदार धरावे, अशी मागणी होत आहे.