शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

२ कोटी ३४ लाखाचे सावकारी कर्ज माफ!

By admin | Updated: January 5, 2016 02:09 IST

बुलडाणा जिल्ह्यात ४८ सावकार ; १ हजार १२0 शेतकरी कर्जदार.

बुलडाणा : विविध बँकांबरोबरच शेतीसाठी खासगी सावकाराकडून शेतकर्‍यांनी घेतलेले २ कोटी ३४ लाख २४ हजार रुपयांचे सावकारी कर्ज शासनाने माफ केले आहे. जिल्हास्तरीय समितीने नुकत्याच घेतलेल्या निर्णयानुसार सदर रक्कम मंजूर केल्यामुळे खासगी सावकाराकडून कर्ज घेतलेल्या शेतकर्‍यांना दिलासा मिळाला आहे. मुख्यमंत्र्यांनी केलेल्या घोषणेनुसार जिल्हा प्रशासनाकडे सावकारी कर्ज असलेल्या शेतकर्‍यांचे अर्ज मागविण्यात आले होते. या अर्जाची संबंधित समितीने छाननी करून जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत या कर्ज प्रकरणाच्या प्रस्तावावर चर्चा होऊन एकूण १५0 सावकारांच्या ९८२ कर्ज प्रकरणांचा निपटारा करण्यात आला. उर्वरित प्रकरणे अद्यापही बाकी आहेत. बुलडाणा, मेहकर, लोणार, मलकापूर, नांदुरा, जळगाव जामोद, खामगाव आणि शेगाव या ८ तालुक्यातील ९८२ शेतकर्‍यांनी १ कोटी ९९ लाख रुपयांच्या सावकारी कर्जमाफीच्या प्रकरणाची दखल घेण्यात आली होती. या रकमेवरील व्याज म्हणून ३५ लाख २४ हजार रुपये असे एकूण २ कोटी ३४ लाख २४ हजार रुपयांची कर्जमाफी देण्यात आली आहे. जिल्हा प्रशासनाकडे सादर केलेल्या प्रकरणाची चौकशी करून त्यातून प्रकरणे मंजूर करण्यात येत आहेत. यात अधिकाधिक शेतकर्‍यांना योजनेचा लाभ मिळावा, याकरिता जिल्हा प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत. जिल्हास्तरीय समितीकडे आणखी काही प्रकरणे दाखल करण्यात आली आहेत. त्यावर लवकरच निर्णय घेण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून कळविण्यात आले आहेत. असे असले तरी बरेच शेतकरी या योजनेच्या लाभापासून वंचित राहत असल्यामुळे शेतकर्‍यांच्या सावकारी कर्ज प्रकरणात अजूनही अनेक शेतकरी अडकलेले आहेत.