शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
2
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
3
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
4
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
5
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
6
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
7
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
8
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
9
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
10
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
11
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
12
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
13
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
14
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
15
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
16
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
17
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
18
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
19
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
20
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!

प्रतीक्षा यादीतील शिक्षकांना ठेंगा!

By admin | Updated: July 13, 2016 02:11 IST

आंतरजिल्हा बदली प्रक्रियेच्या दुस-या टप्प्यात अन्याय झाल्याचा शिक्षकांचा आरोप.

हर्षनंदन वाघ / बुलडाणाजिल्ह्यातील परंतु बाहेर जिल्ह्यात नोकरीवर असलेल्या १३५ शिक्षकांची २१ जून रोजी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने जिल्ह्यातील विविध शाळांमध्ये पदस्थापना केल्यानंतर दुसर्‍या टप्प्यात ५ जुलै रोजी १८८ आंतरजिल्हा शिक्षकांच्या बदल्या करण्यात येणार होत्या. मात्र दुसर्‍या टप्प्यात आंतरजिल्हा शिक्षकांची पदस्थापना न करता सिईटीच्या प्रतिक्षा यादीतील उमेदवारांना घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे आंतरजिल्हा बदलीच्या प्रतिक्षेत असलेल्या उमेदवारांवर अन्याय झाला आहे.बुलडाणा जिल्ह्यात मागील काही वर्षापासून आंतरजिल्हा शिक्षकांच्या पदस्थापन प्रक्रिया राबविण्याचा प्रश्न प्रलंबित होता. याबाबत प्रतिक्षेत असलेल्या जवळपास ६00 शिक्षक उमेदवारांनी पदस्थापना करण्याबाबत अर्ज दिले होते. दरम्यान जिल्हा परिषद प्रशासनाने आंतरजिल्हा बदलीला हिरवी झेंडी दिल्यानंतर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने २१ जून रोजी शिक्षकांच्या पदस्थापनेची प्रक्रीया सुरू केली. यावेळी १३५ शिक्षकांना जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या विविध शाळेत पदस्थापना दिली. बुलडाणा जिल्ह्यात विविध शाळांमध्ये शिक्षकांची ३२३ पदे ही रिक्त होती. त्यापैकी १३५ शिक्षकांना पदस्थापना मिळाल्यानंतर उर्वरित १८८ शिक्षकांची पदस्थापना ५ जुलै रोजी दुसर्‍या टप्प्यात करण्यात येणार असल्याचे आश्‍वासन शिक्षण विभागाने दिले होते. मात्र ५ जुलै रोजी आंतरजिल्हा बदलीसाठी प्रतिक्षेत असलेल्या शिक्षकांना डावलून २0१0 मध्ये सिईटीच्या प्रतिक्षा यादीत असलेल्या उमदेवारांच्या कागदपत्रांची तपासणी करण्यात आली. त्यामुळे आंतरजिल्हा बदलीसाठी दुसर्‍या टप्प्याच्या प्रतिक्षेत असलेले शिक्षकांमध्ये तिव्र रोष व्यक्त होत आहे.