बुलडाणा : लोकसभा निवडणुकीत तरूण मतदारांनी घेतलेला सक्रिय सहभाग पाहता विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी तरूणांना आकर्षित करण्यासाठी मोर्चेबांधणी केली आहे. या पृष्ठभूमीवर आज ह्यलोकमतह्ण ने बुलडाणा शहरातील विविध महाविद्यालयांच्या ह्यकॅम्पसह्ण मध्ये सर्वेक्षण केले. या सर्वेक्षणातील निष्कर्ष तरूणाईची मानसिकता प्रातिनिधीक स्वरूपात स्पष्ट करीत आहे. तब्बल ७३ टक्के तरूण उमेदवार पाहून मतदान करणार असल्याचे या सर्वेक्षणात समोर आले आहे. विशेष म्हणजे तब्बल ३३ टक्के तरूण ही संधी मिळाली तर राजकारणात करिअर करू इच्छीतात, ही बाब या निमित्ताने स्पष्ट झाली आहे. बुलडाणा शहरात करण्यात आलेल्या सर्वेक्षात आज तरूणांशी संवाद साधला असता आजच्या राजकारणावर युवापिढी आपली मते स्पष्टपणे मांडत असल्याचे दिसून आले. सोशल मीडियाच्या माध्यमातून होणार्या प्रचाराचा स्तर योग्य असल्याचा निष्कर्ष ५१ टक्के तरूणांचा आहे तर असा प्रचार अयोग्य असल्याचे मत ३६ टक्के तरूणांचे आहे. केवळ ११ टक्के तरूणांना सोशल मीडियावरील प्रचार हा केवळ आरोप -प्रत्यारोपाचा असल्याचा वाटतो. राजकीय पक्षाच्या सभांना जाता का, या प्रश्नाच्या उत्तरात १७ टक्के तरूण हो म्हणतात तर ५४ टक्के तरूणांना प्रचार सभेला जाणे पसंत नाही. ११ टक्के तरूण कधी-कधी प्रचार सभांना हजेरी लावतात, हे दिसून आले. तरूणांना विचारलेल्या विविध प्रश्नांची मिळालेली उत्तरे ही राजकारणातील बदलत्या प्रवाहाचे द्योतक असून, युवा पिढी राजकीयदृष्ट्या सजग होत असल्याचे स्पष्ट होते.
उमेदवार पाहूनच मतदान
By admin | Updated: August 13, 2014 00:13 IST