शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
2
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
3
Top Marathi News LIVE Updates: भोंदू खरात प्रकरणी ईडीची मोठी कारवाई; ११ ठिकाणी टाकली धाड, मालमत्तेची चौकशी
4
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
5
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
6
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
7
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
8
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
9
धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित
10
गोकूळमध्ये गैरप्रकार? शिवाजीराव पाटलांच्या आरोपांवर हसन मुश्रीफ यांचं स्पष्टीकरण
11
ABMCM: अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या बचावासाठी सरसावले चित्रपट व्यावसायिक
12
Asha Bhosle: सूरसम्राज्ञी आशा भोसलेंचा पहिला नमस्कार अंबाबाईला.. दुसरा सरस्वतीला
13
Kolhapur: 'केडीसीसी'ची खुर्ची एवढी वजनदार, की कर्मचाऱ्यांना दहा वर्षे सोडवेना
14
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
15
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
16
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
17
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
18
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
19
वेगाचा बादशाह जेव्हा स्वराभिषेकात न्हाऊन निघाला, ब्रेट लीने आशा भोसले यांच्यासोबत गायले होते गाणे
20
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
Daily Top 2Weekly Top 5

वाहतूक नियमांचे उल्लंघन, दाेन लाखांच्यावर दंड वसूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:40 IST

बुलडाणा : नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांविरुद्ध वाहतूक शाखेच्या वतीने जिल्हाभरात विशेष माेहीम राबविण्यात आली आहे. दाेन दिवसांत नियमांचे ...

बुलडाणा : नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांविरुद्ध वाहतूक शाखेच्या वतीने जिल्हाभरात विशेष माेहीम राबविण्यात आली आहे. दाेन दिवसांत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या १०२३ वाहन चालकांवर कारवाई करून २ लाख ३८ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

जिल्ह्यात गत काही दिवसांपासून वाहन चालकांकडून नियमांचे उल्लंघन करण्यात येत आहे. अनेक वाहन चालक आपल्या वाहनांवर फॅन्सी नंबर प्लेट लावून फिरवत आहेत तसेच ट्रिपल सीट, वाहन चालविण्याचा परवाना नसणे, आदी प्रकार वाढले हाेते. जिल्हा वाहतूक शाखेच्या वतीने २२ व २३ सप्टेंबर राेजी जिल्हाभरात विशेष माेहीम राबवण्यात आली आहे. २२ सप्टेंबर राेजी ४६३ वाहन चालकांवर कारवाई करून त्यांच्याकडून १ लाख १३ हजार १०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे तसेच २३ सप्टेंबर राेजी ५६० वाहन चालकांकडून १ लाख २५ हजार ४०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

कागदपत्रे न वापरणाऱ्यांची संख्या वाढली

वाहतूक शाखेने २२ सप्टेंबर राेजी केलेल्या कारवाईत अनेक वाहन चालकांकडे वैध कागदपत्रे आढळून आली नाहीत. कागदपत्रे न बाळगणाऱ्या १७५ वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली तसेच ट्रिपल सीट ५८, सीटबेल्ट न बांधणाऱ्या ३१ कार चालक, नाे पार्किंगमध्ये वाहने उभे करणाऱ्या ६१ जणांवर कारवाई करण्यात आली.

थकीत दंड वसुलीची माेहीम

जिल्हा वाहतूक शाखेच्या वतीने थकीत दंड वसुलीची माेहीम राबविण्यात आली आहे. या माेहिमेंतर्गत ८१५ वाहन चालकांकडून २ लाख ४२ हजार ६०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. या दिवशी थकीत दंड न भरणाऱ्यांसाठी २५ सप्टेंबर रोजी जिल्ह्यातील सर्व तालुका न्यायालयात थकीत दंडाच्या रकमेचा भरणा करून घेण्याकरिता लोकअदालत आयोजित करण्यात येणार आहे. या दिवशी न्यायालयात जाऊन अपला दंड भरून शासनास सहकार्य करावे, असे आवाहन पाेलीस अधीक्षक अरविंद चावरीया, प्रभारी वाहतूक शाखा निरीक्षक शांतीकुमार पाटील यांनी केले आहे.