शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिली ते चौथी हिंदी भाषा नको, अजित पवारांची भूमिका; भाजपामुळे होतेय एकनाथ शिंदेंची कोंडी?
2
महाराष्ट्रातील खासदाराच्या ड्रायव्हरला ड्रायव्हरला १५० कोटी रुपयांची जमीन कोणी भेट दिली?,चौकशी सुरू
3
"एक-दोन नव्हे, माझ्या जावयाच्या १२ गर्लफ्रेंड"; पत्नीला संपवणाऱ्या पतीची सासूने केली पोलखोल
4
ब्रिटनचे मालवाहू विमान भारताकडे झेपावले, युद्धनौका समुद्रात नांगर टाकून; लढाऊ विमान दुरुस्तीसाठी ४० अभियंते येणार...
5
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
6
ना नतांज, ना फोर्डो...! इस्रायलच्या नादात अमेरिकाही फसली? इराणने चकवत दुसरीकडेच सिक्रेट अण्वस्त्र अड्डा बनविलेला...
7
एवढे कोणीच करत नाही, पण ग्रुपने रतन टाटांचा वारसा जपला; मृतांच्या कुटुंबीयांसाठी ट्रस्ट स्थापणार
8
शिखर धवन लपून छपून गर्लफ्रेंडला टीम इंडियाच्या हॉटेल रुममध्ये आणायचा! रोहितनं केली होती तक्रार
9
Jagannath Yatra 2025: जगन्नाथाच्या गाभाऱ्यात समुद्राची गाज अडवण्यास हनुमंत ठरले कारणीभूत!
10
"राजकारणात फक्त आशिष शेलारांना ओळखते..."; ठाकरे बंधूंच्या मराठी मोर्चावर आशा भोसले काय म्हणाल्या?
11
अदानींनी खरेदी केली आणखी एक कंपनी, किती कोटींना झाली डील? शेअर्स सुस्साट...
12
तुम्ही ज्या विमानातून प्रवास करणार, ते किती जुने? सर्व्हिसिंग कधी केलेली? अशाप्रकारे जाणून घ्या...
13
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासाठी १९ इनोव्हा मागवल्या, डिझेल भरायला गेल्या आणि पाणी भरून आल्या...
14
घरात सापडली संशयास्पद कागदपत्रे, पती देशद्रोही तर नाही ना? महिलेला आला संशय, त्यानंतर उचललं असं पाऊल   
15
आज दोघं एक पाऊल पुढे आलेत, भविष्यात एकत्र दिसतील ही खात्री; ठाकरे बंधूंचे मामा काय बोलले?
16
" हा तर गमावलेली राजकीय स्पेस मिळवण्याचा प्रयत्न, यांना मराठी भाषेशी…’’, ठाकरे बंधूंच्या एकत्र मोर्चाची भाजपाकडून खिल्ली
17
Jagannath Rath Yatra 2025: जगन्नाथाच्या मूर्तीला डोळे, नाक आणि ओठ एवढेच अवयव का? त्यामागे आहे रहस्यमय कथा!
18
संजय लीला भन्साळींसोबत करीनाचं असं आहे नातं, विकीसमोर केला खुलासा, म्हणाली - "लव्ह अ‍ॅण्ड वॉरवाला..."
19
सरकारी नोकरीसाठी फक्त परीक्षा पास होणे पुरेसे नाही? CIBIL स्कोअरही महत्त्वाचा; एकाची नियुक्ती रद्द

व्हिडीओ- संतनगरीत रंगला अनुपम्य सोहळा

By admin | Updated: July 15, 2016 19:15 IST

विठ्ठलनामाचा गजर आणि भक्तिमय वातावरणात हजारो वारक-यांनी प्रतिपंढरपूर समजल्या जाणाऱ्या सन्तनगरी शेगावात आषाढी यात्रेचा अनुपम सोहळा अनुभवला.

ऑनलाइन लोकमतखामगाव, दि. 15 - विठ्ठलनामाचा गजर आणि भक्तिमय वातावरणात हजारो वारक-यांनी प्रतिपंढरपूर समजल्या जाणाऱ्या सन्तनगरी शेगावात आषाढी यात्रेचा अनुपम सोहळा अनुभवला. गजानन महाराजांच्या पंढरीत आषाढी एकादशी यात्रा सोहोळा शुक्रवारी लाखोच्या वर भाविकांच्या उपस्थितीत झाला. गजानन महाराजांनी पंढपुरात भक्त बापूना काळे यांना पाटील यांच्या वाड्यात (मठात) विठ्ठल रूपात दर्शन दिले. तेव्हापासून जे भक्त श्री विठ्ठलाचे दर्शन घेण्यास पंढरपूरला जाऊ शकत नाहीत ते भक्त सरळ गजानन महाराजांच्या पंढरीत येऊन गजानन महाराजांना विठ्ठल रूपात पाहून नतमस्तक होतात.या गजरात अभंगाच्या सुरात आषाढी एकादशीला श्रीच्या पालखीचा नगर परिक्रमेने प्रारंभ झाला. संस्थानचे व्यवस्थापक कर्मयोगी शिवशंकरभाऊ पाटील याप्रसंगी प्रश्नमुख्याने उपस्थित होते. ह्यश्रीह्णची पालखी दत्त मंदिर, श्रीचे प्रगट स्थळ, महादेव मंदिर मागार्ने गेल्यावर, शिवशंकर हरिहर मंदिर, मारुती मंदिर या ठिकाणी विश्वस्तांच्या हस्ते विधिवत पूजा झाली. याप्रसंगी संस्थानचे विश्वस्त श्रीकांतदादा पाटील, नारायणराव पाटील आदी उपस्थित होते. शेगाव:विदभार्ची पंढरी संतनगरी शेगावात श्री गजानन महाराज मंदिरात आषाढी एकादशीचा पारंपरिक सोहळा १५ जुलै रोजी साजरा पार पडला दरवर्षीप्रमाणे शुक्रवारी शहरातून श्रींच्या पालखीची दुपारी २ वाजता नगर परिक्रमा करण्यात आली. दुपारी २ वाजता गज, अश्व, श्रींच्या रजत मुखवट्यासह शहर परिक्रमा करण्यात आली. ह्यश्रीह्णची पालखी फुलेनगर, श्रीचे प्रगटस्थळ, मारुती मंदिर, लायब्ररी, बाजार, व्यापारपेठ या मागार्ने नगर परिक्रमा करती झाली. बाजार, व्यापारपेठ या मागार्ने नगर परिक्रमा करती झाली. यावेळी सोहळ्यासाठी संतनगरीत भाविक भक्तांची मांदियाळी फुलली होती.शेगाव संस्थांच्या वतीने आषाढी एकादशीचा उत्सवही थाटामाटात व हजारो भक्तांच्या साक्षीने साजरा केल्या जातो. संध्याकाळी श्रींच्या मंदिरात पोहचल्यानंतर आरती झाल्या नंतर टाळकऱ्यांचा 'रिंगण सोहळा' पार पडणार पडला. आषाढी एकादशी निमित्त दुपारी २ वाजता श्रींची पालखी, अश्व, गज, रथ, मेनासह नगर परिक्रमासाठी निघाली असता पालखीच्या अग्रभागी विठोबाची प्रतिमा असलेला गजराज व अश्व, पताकाधारी व विठ्ठलनामाचा, ज्ञानोबा तुकाराम गजाननाचा नामघोष करत संत नगरी दुमदुमली. भक्तीमय वातावरण निर्माण करणारा हा पालखी सोहोळा शहरातील प्रमुख मार्गावरून फिरून सायंकाळी श्रींची पालखीची आरती झाली. श्रींच्या पालखीच्या मिरवणुकीने नागरिकांचा उत्साह ओसंडून वाहत होता. प्रमुख मार्गावर सुहासिनींनी सडा टाकून ठिकठिकाणी रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. पुरुष व महिलांनी श्रींच्या पालखीच्या दर्शनासाठी एकच गर्दी केली होती. आषाढी एकादशीनिमित्त शहरात महाप्रसाद म्हणून फराळांचे वाटप करण्यात आले तर सायंकाळी संसथान मधे कीर्तन झाले. शेगावात होणारी गर्दी लक्षात घेता पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आले. शेगाव पोलीस स्टेशनचे ६0 कर्मचारी तसेच इतर २ अधिकारी, २0 कर्मचारी, १0 महिला कर्मचारी, १0 ट्राफिक पोलीस असा एकूण १00 कर्मचाऱ्यांच्या ताफ्यासह अतिरिक्त पोलीस अधीक्षक यशवंत सोळंके, उपविभागीय अधिकारी रूपाली दरेकर, शेगावचे ठाणेदार यशवंत बावीस्करयांनी चोख बंदोबस्त ठेवला.