शहरं
Join us  
Trending Stories
1
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
4
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
5
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
6
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
7
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
8
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
9
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
10
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
11
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
12
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
13
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
14
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
15
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
16
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
17
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
18
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
19
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
20
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय रक्तपेढीत अत्यल्प रक्तसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:39 IST

सर्वश्रेष्ठ दान म्हणून रक्तदानाकडे पाहिले जाते. अपघातातील रुग्णांसह काही महत्त्वाच्या शस्त्रक्रियेसाठी आ‌वश्यक असते ते रक्त. मात्र, मागील काही दिवसांपासून ...

सर्वश्रेष्ठ दान म्हणून रक्तदानाकडे पाहिले जाते. अपघातातील रुग्णांसह काही महत्त्वाच्या शस्त्रक्रियेसाठी आ‌वश्यक असते ते रक्त. मात्र, मागील काही दिवसांपासून आणि कोरोनाच्या काळात बंद झालेले रक्तदान यामुळे येथील शासकीय रक्तपेढीत सध्या केवळ ६१ पिशव्यांच्या रक्तसाठा शिल्लक असल्याची माहिती आहे. यामध्ये सर्वाधिक ए पाॅझिटिव्ह रक्त गटाच्या २४ पिशव्या असून, इतर रक्त गटांच्या पिशव्यांची संख्या ही अगदीच तुटपुंजी आहे. यामुळे जिल्ह्यात रक्ताचा तुडवडा जाणवत असून, आता तरी तिसऱ्या लाटेच्या आधी जिल्ह्यात रक्ताचा साठा मोठा प्रमाणात उपलब्ध व्हावा यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

असा रक्तसाठा

गट संख्या

ए पाॅझिटिव्ह २४

ए निगेटिव्ह ०१

बी पॉझिटिव्ह ०४

बी निगेटिव्ह ०२

ओ पॉझिटिव्ह १४

ओ निगेटिव्ह ०४

एबी पॉझिटिव्ह १२

एबी निगेटिव्ह ००

संभाव्य तिसऱ्या लाटेच्या आधी उपाययोजना गरजेची

पुढील काही महिन्यांत संभाव्य तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तेव्हा पुन्हा रक्तदानाला खिळ बसणार आहे. मात्र, याच आधी उपाययोजना केल्यास येणाऱ्या काळात रक्ताचा तुडवडा जाणवणार नाही. तरी या संभाव्य लाटेच्या आधी रक्तदात्यांनी पुढे येऊन रक्तदान करावे असे आवाहन करण्यात आले आहे.

रक्तदात्यांनी आता या घडीला पुढे येऊन रक्तदान करणे गरजेचे आहे. तुमचे रक्त कोणाचे तरी प्राण वाचवू शकते. तेव्हा संभाव्य लाटेच्या आधी दात्यांनी रक्तदानासाठी पुढे सरसावावे.

-ज्ञानेश्वर राऊत, रक्त संक्रमण अधिकारी, बुलडाणा.