शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
4
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
5
बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
6
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
7
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
8
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
9
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
10
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
11
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
12
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
13
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
14
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
15
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
16
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
17
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
18
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
19
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
20
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

लस हाच उपाय; लसीकरणानंतर बुलडाणा जिल्ह्यात एकही मृत्यू नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 10:52 IST

Corona Vaccine : दाेन्हीही डाेस घेतल्यानंतर साधारणात: २८ ते ३० दिवसानंतर शरीरामध्ये ॲण्टीबाॅडी तयार हाेतात़.

ठळक मुद्देलसीकरण झालेल्यांपैकी केवळ ००़४ टक्के नागरिकांनाच काेराेना झाला आहे. लसीकरण झालेल्या एकाही नागरिकाचा मृत्यू झाला नाही़.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : वाढता काेराेना संसर्ग राेखण्यासाठी देशभरात लसीकरण सुरू करण्यात आले आहे़  लसीकरणाचे फायदे आता दिसून येत असून जिल्ह्यात लसीकरण झालेल्या एकाही नागरिकाचा मृत्यू झाला नाही़.  तसेच लसीकरण झालेल्यांपैकी केवळ ००़४ टक्के नागरिकांनाच काेराेना झाला आहे. त्यांनाही साैम्य लक्षणे असल्याने काेराेनावर लस हाच उपाय असल्याचे समाेर आले आहेे. जिल्ह्यात जानेवारी महिन्यापासून काेराेना रुग्णांची संख्या वाढत आहे़  मार्च व एप्रिल महिन्यात काेराेनाचा कहर सुरू झाला आहे़   काेराेना संसर्ग राेखण्यासाठी देशपातळीवर विविध उपाययाेजना करण्यात येत आहे़  काेराेनाचा प्रभाव कमी करण्यासाठी काेविशिल्ड आणि काेवॅक्सिनचे लसीकरण सुरू करण्यात आले आहे़ पहिला डाेस दिल्यानंतर २८ दिवसानंतर रुग्णांना दुसरा डाेस देण्यात येत आहे़  दाेन्हीही डाेस घेतल्यानंतर साधारणात: २८ ते ३० दिवसानंतर शरीरामध्ये ॲण्टीबाॅडी तयार हाेतात़ त्यामुळे, काेराेना हाेण्याची शक्यता कमी हाेते.  जिल्ह्यात आतापर्यंत लस घेतलेल्या एकाही रुग्णांचा काेराेनामुळे मृत्यू झालेला नाही.पहिल्या डाेसनंतर पाच टक्के पाॅझिटिव्ह n पहिला डाेस घेतल्यानंतर पाच टक्के लाेकांना काेराेनाची लागण झाली हाेती़ यामध्ये सुरुवातीच्या काळात फ्रंटलाइन वर्करची त्यातही आराेग्य कर्मचाऱ्यांची संख्या जास्त हाेती़ n पहिला डाेस घेतल्यानंतर २८ दिवसांनी दुसरा डाेस घ्यावा लागताे़  दुसरा डाेस घेतल्यानंतर २८ दिवसांनी ॲण्टीबाॅडीज तयार हाेतात़ n दाेन्ही डाेस घेतल्यानंतरही मास्कचा वापर, फिजिकल डिस्टन्सिंग तसेच वारंवार हात धुणे आदी नियमांचे पालन करावे लागते़ लसीमुळे रुग्ण गंभीर हाेत नाही. 

दाेन्ही डाेस नंतर केवळ ००.४ टक्के पाॅझिटिव्ह जिल्ह्यात १६ जानेवारीपासून सुरू झालेली लसीकरण माेहीम वेगाने सुरू आहे़  आधी फ्रंटलाइन वर्कर व त्यानंतर सर्वसामान्यांना लस देण्यात येत आहे़  दाेन्ही लस घेतलेल्या केवळ ००़४ टक्के लाेकांनाच काेराेना संसर्ग झाल्याचे चित्र आहे़ यापैकी अनेकांना साैम्य लक्षणे आहेत़  त्यामुळे, डाॅक्टरांच्या मार्गदर्शनात घरीच उपचार घेत आहेत़  त्यामुळे, नागरिकांनी लस घेण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे़.

 काेराेनावरील लस पूर्णपणे सुरक्षित आहेत़  लसीमुळे रुग्णाची राेगप्रतिकार शक्ती वाढत असल्याने काेराेनाचा प्रभाव कमी हाेताे़.  रुग्ण गंभीर स्थितीत पाेहचत नसल्याने जिल्ह्यात आतापर्यंत लस घेतलेल्या एकाही नागरिकाचा काेराेनामुळे मृत्यू झालेला नाही़. त्यामुळे, लस घेण्यासाठी पुढाकार घ्यावा़.-डाॅ़ नितीन तडस, जिल्हा शल्यचिकित्सक, बुलडाणा

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसbuldhanaबुलडाणा