शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

वापरलेले रॅपीड टेस्ट किटस्, मास्क उघड्यावर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:39 IST

नागरिकांचे आरोग्य धोक्यात चिखली : कोरोनाचे रूग्ण घटल्यामुळे थोडे हायसे वाटत असतानाच शहरात कोरोनाने पुन्हा डोके वर काढण्यास ...

नागरिकांचे आरोग्य धोक्यात

चिखली : कोरोनाचे रूग्ण घटल्यामुळे थोडे हायसे वाटत असतानाच शहरात कोरोनाने पुन्हा डोके वर काढण्यास सुरूवात केली आहे. यापृष्ठभूमीवर तालुका प्रशासनाने खबरदारच्या उपाययोजनाअंतर्गत शहरात प्रवेशणाऱ्या नागरिकांची ‘रॅपिड टेस्ट’ बंधनकारक केली आहे. यानुषंगाने शहरात पाच ठिकाणी तपासणीसाठीचे स्टॉल देखील लावण्यात आले आहेत. मात्र, याठिकाणी केल्या जाणाऱ्या ‘रॅपिड टेस्ट किटस्’ वापरानंतर सर्रासपणे रस्त्यावर फेकले जात आहेत. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

जिल्ह्याची कोरोनामुक्तीकडे वाटचाल सुरू असतानाच चिखली तालुक्यात पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले आहेत. आजरोजी तालुक्याचा पॉझिटिव्ह रेट दिवसागणीक वाढत आहे. तपासणीतून दहा पैकी दोन जणांचे अहवाल पॉझिटिव्ह येत असल्याने चिंता वाढली आहे.चिखली शहरात प्रवेशासाठी १० आॅगस्ट पासून ‘रॅपिड अ‍ॅन्टीजन’ तपासणी अनिवार्य करण्यात आली आहे. आरोग्य विभागाने शहरातील श्री शिवाजी उद्यान, राऊतवाडी स्टॉप, सैलानी नगर, जफ्राबाद रोड टी- पाँईट व श्री शिवाजी विद्यालय या पाच ठिकाणी तपासणीसाठीचे स्टॉल लावण्यात आले आहेत. यातील राऊतवाडी येथील तपासणी स्टॉलमध्ये तपासणीसाठी वापरलेले किटस् सर्रासपणे रस्त्यावर फेकले जात असल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. कोरोना तपासणीनंतरचे रॅपिड किटस्, मास्क, स्वॅब नमूने घेण्यासाठी वापरण्यात येणारे कॉटनस्वॅबच्या नळ्या आदी साहित्य स्टॉलच्या आजुबाजूला अत्यंत बेजबाबदारपणे फेकण्यात आले आहेत. याप्रकाराने या भागातील नागरिकांमध्ये भिती पसरली आहे. दरम्यान शहर व तालुक्यात कोरोनाचा प्रकोप पुन्हा वाढू नये यानुषंगाने तालुका प्रशासनासह आरोग्य विभाग योग्य ती खबरदारी घेत असतानाच आरोग्य विभागातील कर्मचारी आपल्या कर्तव्यात कसूर ठेवून आपल्या विभागाच्या कर्तव्य तत्परतेला नख लावण्याचे काम करीत असल्याने या प्रकाराबाबत तीव्र रोष देखील व्यक्त होत आहे.

शहरात पाच ठिकाणी तपासणी स्टॉल

आरोग्य विभागाद्वारे शहरात पाच ठिकाणी ‘रॅपिड अ‍ॅन्टीजेन’ तपासणीचे स्टॉल उभारले आहेत. या स्टॉलव्दारे ११ आॅगस्ट रोजी ५२९ तर १२ आॅगस्ट रोजी ५८४ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या आहेत. दरम्यान शहरात मास्क, सामाजिक अंतर राखणे व इतर आवश्यक गोष्टींच्या पालनाबाबत सूचना देण्यात येत असून, नियम मोडणाऱ्यांवर दंड वसूल केला आहे.

या प्रकाराबाबत माहिती मिळताच संबंधित ठिकाणी जैविक कचऱ्याची योग्य प्रकारे विल्हेवाट करण्याबाबत सूचना दिल्या आहेत. असा प्रकार पुन्हा घडणार नाही, याची दक्षता घेण्यात येत आहे. तसेच कोरोनाचा पुन्हा उद्रेक होवू नये म्हणून आरोग्य विभागाव्दारे सर्व खबरदारीचे उपाय केले जात आहेत.

-डॉ.सांगळे, प्रभारी तालुका आरोग्य अधिकारी, चिखली.