शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
Latest Marathi News LIVE Updates: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई
3
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, जाणून घ्या एका रात्रीचं भाडं
4
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
5
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
6
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
7
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
8
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
9
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
10
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
11
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
12
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
13
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
14
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
15
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
16
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
17
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
18
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
19
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
20
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
Daily Top 2Weekly Top 5

मेहनत शेतक-याची अन कमाई व्यापा-याची!

By admin | Updated: June 17, 2016 02:45 IST

भाजीपाल्याचे दर वाढले, मात्र त्याचा लाभ शेतक-यांना नाहीच.

नाना हिवराळे , मनोज पाटील / खामगाव,मलकापूरबाजारात भाजीपाल्याचे भाव कडाडले असताना, या भाववाढीचा शेतकर्‍यांना फायदा होत नसून, शेतकर्‍याचा भाजीपाला दुपटीने विक्री करून व्यापारीच मालामाल होत असल्याचे चित्र आहे. खामगाव येथील आठवडी बाजारात दररोज पहाटे ४ पासून भाजीपाला हर्रासीला सुरुवात होते. जिल्ह्यासोबतच अकोला जिल्ह्यातूनही भाजीपाला विक्रीसाठी आणला जातो. आठवडी बाजारात मध्यरात्री ३ पासूनच रेलचेल सुरू होते. बाजारात भाजीपाला विक्रीस आलेला असताना वांगी ३0 ते ४0 रुपये किलो, पालक २५ ते ३0 रुपये, चवळी शेंगा ५0 ते ५५ रुपये, ढेमसे २५ ते ३0 रुपये, घोळ भाजी २0 ते २५ रुपये, भेंडी ४0 ते ४५ रुपये, गवार ३0 ते ३५ रुपये, गोबी २५ ते ३0 रुपये, कोथिंबीर ४0 रुपये, चवळी भाजी २५ ते ३0 रुपये, भोपळा २५ ते ३0 रुपये किलो याप्रमाणे हर्रासीत भाव मिळतो. भाज्यांचे दर कडाडले असताना अपेक्षेप्रमाणे भाव मिळाला नसल्याने शेतकर्‍यांनी नाराजी व्यक्त केली. खेड्यांमधून गाडी भाड्याने आणण्याचा खर्च जास्त लागतो. अशा स्थितीत बाजारात हमाली, मोजमाप व अडत वजा करून घ्यावी लागते. खामगावात अडत दर शेकडा १0 टक्के एवढय़ा प्रचंड दराने कपात कपात करून घेत असल्याचे दिसून आले. एक हजाराचा भाजीपाला विक्री केल्यास १00 रूपये अडत कपात होत असताना शेतकर्‍यांना हा फटका मोठा वाटतो. दुष्काळाच्या स्थितीत कमी पावसात भाजीपाला पिकवताना लागणार्‍या कष्टाचे चीज होत नसल्याची त्यांची प्रतिक्रिया होती. हाच प्रकार मलकापूर उपबाजार समितीमध्ये दिसून येत आहे. शेतकर्‍यांचे मालाचे भाव व्यापारीच ठरवितात; मात्र भाव वाढवत असल्याचा देखावा उभा करतात. बोलीतून अधिक भाव देईल, त्याला माल दिला जातो. नंतर शेतकर्‍याला त्या मालाचे पैसे संबंधित अडते वजनानुसार देतात; परंतु काही अडते सदर पैसे देताना बाजार समिती नियमानुसार शेतकर्‍यांकडून मापाई व हमाली मिळून तीन टक्के अडत कापण्याऐवजी त्यांना हिशेबाच्या कच्चा चिठ्ठय़ा देऊन समोर शेकडा तीन टक्के अडत, तर त्याच चिठ्ठीच्या पाठीमागे शेकडा दहा टक्के अडत कापून उर्वरित पैसे शेतकर्‍याला देतात. असा लुटीचा गंभीर प्रकार नियमितच घडतो. त्यानंतर चिल्लर विक्रेते, व्यापारी आठवडी बाजारात तोच माल चढय़ा दराने विक्री करतात. ही बाब सकाळी ९ वाजताच्या सुमारास आठवडी बाजारात निदर्शनास आली. शेतकरी मोठय़ा कष्टाने शेतातून भाजीपाला उत्पादित करतो, तोच खर्‍या अर्थी लुटल्या जातो. अडत्याशी असलेल्या संबंधाला शेतकरी भोळेपणातून जपतो. म्हणून तो राहतो उपाशी अन् अडते-व्यापारी व भाजीपाला विक्रेते मात्र तुपाशी; असा विरोधाभास हा कायमस्वरूपी आहे व पुढेही राहणार, एवढे खरे!