शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा जिल्ह्यात कोरोनाचे आणखी दोन बळी; २७१पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 11:18 IST

CoronaVirus चिखली येथील ५० वर्षीय व्यक्ती व बुलडाणा येथील ७० वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : सलग दुसऱ्या दिवशी जिल्ह्यात कोरोनाने दोघांचा बळी घेतला आहे, तर शुक्रवारी तपासणी केलेल्या अहवालांपैकी २७१ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. १७४५ जणांचे अहवाल शुक्रवारी प्राप्त झाले होते. त्यापैकी १६ टक्के नमुने हे कोरोनाबाधित आढळून आले आहेत.पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये बुलडाणा २७, कोलवड एक, सागवन एक, नांदुरा १९, काटी एक, पिंप्री आढाव दोन, सुटाळा बुद्रूक एक, टेंभुर्णा एक, माक्ताेक, बोथाकाजी एक, खामगाव १७, शेगाव १९, जानोरी सहा, गायगाव पाच, सांगवा एक, पिंपळवाडी एक, मेहकर आठ, जानेफळ एक, डोणगाव एक, चिखली २७, कोलारा एक, पेठ एक, खैरव दोन, मंगरूळ नवघेर तीन, दहीगाव एक, टाकरखेड वायाळ एक, करवंड दोन, भरोसा एक, केळवद एक, देऊळगाव राजा १८, आळंद दोन, मेहुणा राजा एक, गारगुंडी एक, भिवगन दोन, नागणगाव एक, देऊळगाव मही एक, सिनगाव जहागीर १७, डोढ्रा दोन, पिंपळगाव देशमुख एक, झाडेगाव पाच, वडशिंगी एक, कुरणखेड दोन, जळगाव जमोद एक, सि. राजा चार, रुम्हणा दोन, जांभोरा दोन, दुसरबीड एक, सावळा एक, चिंचोली एक, साखरखेर्डा चार, आडगाव राजा एक, उमरगाव एक, मलकापूर १६, एकलारा एक, पळशी दोन, लोणार १७, सुलतानपूर एक, मोताळा तीन आणि अकोला जिल्ह्यातील अंदुरा येथील एक, जालना जिल्ह्यातील रफाळा येथील एक, परतूर येथील एक आणि जाफ्राबाद येथील दोन बाधितांचा यात समावेश आहे. यासोबतच चिखली येथील ५० वर्षीय व्यक्ती व बुलडाणा येथील ७० वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.शुक्रवारी एकूण ६६ जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. यात मलकापूर कोविड केअर सेंटरमधून २१, लोणार चार, चिखली ११, देऊळगाव राजा पाच, जळगाव जामोद एक, खामगाव सहा, बुलडाणा १७, नांदुरा कोविड सेंटरमधील एकाचा यात समावेश आहे. आजपर्यंत तपासणी करण्यात आलेल्या संदिग्धांपैकी एक लाख १८ हजार ३८१ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. १४,३९५ बाधितांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना सुटी झाली.

टॅग्स :buldhanaबुलडाणाcorona virusकोरोना वायरस बातम्या