शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

रुग्णवाहिकेने चिरडल्याने दोघांचा मृत्यू, तीन गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:34 IST

रुग्णवाहिका (क्र.एमएच-२८- बी-७१३६) घेऊन रामदास पुंजाजी जाधव हा चालक मेहकर येथे एका मृत व्यक्तीचे पार्थिव घेऊन गेला होता. दरम्यान, ...

रुग्णवाहिका (क्र.एमएच-२८- बी-७१३६) घेऊन रामदास पुंजाजी जाधव हा चालक मेहकर येथे एका मृत व्यक्तीचे पार्थिव घेऊन गेला होता. दरम्यान, रात्री एक वाजेच्या सुमारास मेहकरवरून बुलडाणा शहरात तो परत आला होता. दरम्यान, महावितरण कार्यालयाकडून त्रिशरण चौकाकडे जात असताना त्याच्या रुग्णवाहिकेचे समोरील टायर फुटल्याने त्याचे रुग्णवाहिकेवरील नियंत्रण सुटले व रस्त्याच्या कडेला पालामध्ये झोपलेल्या चिखली तालुक्यातील सोळंकी व पडोळकर कुटुंबाच्या पालामध्ये त्याची रुग्णवाहिका घुसली. त्यामध्ये उपरोक्त पाचही जण गंभीर जखमी झाले.

या घटनेची माहिती मिळताच बुलडाणा शहर पोलिसांनी त्वरित घटनास्थळ गाठून जखमींना बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी हलविले. यातील अनिल पडोळकर याचा बुलडाणा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर गंभीर अवस्थेतील अन्य चौघांना अकोला येथे उपचारासाठी हलविण्यात आले. अकोला येथे रुग्णालयात उपचारादरम्यान माया पडोळकरचा मृत्यू झाला. अन्य तिघांवर तेथे उपचार करण्यात येत आहेत. पडोळकर व सोळंकी कुटुंब हे बुलडाणा शहरात त्रिशरण चौक परिसरात विळे, कुऱ्हाडी, तवे विकण्याचे काम करीत होते. रस्त्याच्या कडेलाच ते पाल टाकून झोपत होते. याप्रकरणी पोलिसांनी रुग्णवाहिका चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

--डाव्या बाजूकडील टायर फुटले--

रुग्णवाहिकेचे समोरील डाव्या बाजूचे टायर फुटल्याने हा अपघात घडला. यात चालक रामदास पुंजाजी जाधव याचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि रस्त्याच्या कडेलाच पालामध्ये झोपलेल्या या कुटुंबातील दोघांचा मृत्यू झाला. सध्या पोलिसांनी रुग्णवाहिकाही ताब्यात घेतली असून, चालक रामदास पुंजाजी जाधव याची चौकशी करण्यात येत असल्याचे तपासी अधिकारी जयसिंग पाटील यांनी स्पष्ट केले.