शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

सराफा दुकानातून दोन किलो चांदी लंपास

By admin | Updated: July 31, 2014 01:27 IST

शेगाव येथील घटना: महिला चोरांची टोळी सीसी कॅमेर्‍यात कैद.

शेगाव: ज्वेलर्सच्या दुकानामध्ये टोळक्याने जावुन दुकानदाराचे लक्ष विचलीत करुन सोन्या- चांदीचे दागिने लंपास करण्याच्या घटनांमध्ये शेगावात वाढ झाली आहे. आज बुधवारी पुन्हा एका महिलांच्या टोळीने ज्वेलर्सच्या दुकानातील दोन किलो चांदीचे दागीने लंपास केल्याची घटना आज सकाळी घडली. शहरातील मेन रोड वरील तुलसी ज्वेलर्समध्ये आज सकाळी पाच महीलांचे टोळके ज्यामध्ये दोन मुली व एक आठ वर्षीय बालीकेचा समावेश अशांनी प्रवेश करुन दुकानदाराला दागीने दाखविण्याचे सांगितले. दुकानदार ते दागीने काढण्यामध्ये व्यस्त असतांना एका १५ वर्षीय मुलीने काऊंटर ाधील ड्रॉप उघडण्याचा प्रयत्न केला, मात्र दुकानदार त्याच ठिकाणी उभा राहील्याने या महीलांचा प्रयत्न फसला. त्यानंतर या टोळक्याने कुठलीही वस्तु विकत न घेता त्यांनी बाजुच्याच मयुर ज्वेलर्समध्ये प्रवेश करुन दुकानदार वर्मा यांना दागीने दाखविण्याचे सांगितले. वर्मा हे व्यस्त झाल्याचे पाहुन महिलेच्या इशार्‍या वरुन आठ वर्षीय बालीकेने दुकानातील आलमारीमध्ये ठेवलेला चांदीच्या जोडव्यांचा डबा उचलुन महीलेकडे दिला. व यानंतर सर्वांनी तेथुन पोबारा केला. ही बाब काही वेळानंतर वर्मा यांच्या लक्षात आली. सदर दोन्ही घटना ह्या सि.सि.कॅमेर्‍यामध्ये कैद झाल्या असून या दृष्यांमध्ये महिला ह्या चांगल्या घराण्यातील असल्याचे पेहरावावरुन दिसुन येते. वृत्त लिहिपर्यंत या प्रकरणी शेगाव पोलीसांत गुन्हा दाखल झालेला नव्हता. शेगाव शहरात यापूर्वी सुध्द अशा चोरट्या महिलांची टोळी पोलिसांनी पकडली होती. सध्या शहरात अशा प्रकारच्या चोर्‍यामध्ये मोठय़ा प्रमाणावर वाढ झालेली दिसून येत आहे. त्यासाठी नागरीकांनी सतर्क राहण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.