शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

दारूबंदीसाठी दुर्गेचे रुप धारण करा

By admin | Updated: August 24, 2014 00:59 IST

वृषाली बोंद्रे यांचे आवाहन : हिरकणी जनजागृती यात्रेस प्रतिसाद

चिखली : ग्रामीण भागातील महिलांच्या समस्या जाणून घेवून त्यावर उपाय योजना करण्यासाठी विचार विनीयम करणे त्यांच्या कौटुंबिक जीवनात कलह पसरविणार्‍या दारू सारख्या समस्यावर लढा उभारण्यासाठी त्यांची मानसिक तयारी करणे या हेतूने हिरकणी महिला उत्कर्ष प्रतिष्ठाणच्या संस्थापक अध्यक्षा सौ. वृषालीताई बोंद्रे यांनी जनजागृती यात्रा प्रारंभ केली आहे. या यात्रे अंतर्गत २१ ऑगस्ट रोजी माळशेंबा, साकेगांव, भोगावती, भोकर, पळसखेड दौलत व गोद्री या गावात या कार्यक्रम संपन्न झाले. कोणीतरी आपूलकीने विचारपूस करते आहे हे पाहून ग्रामीण महिलाही उत्साहाने या यात्रेत व कार्यक्रमात मोठया संख्येने सहभागी झाल्या. ग्रामीण भागात शासनातर्फे राबविण्यात येणार्‍या घरकूल योजना, रेशन कार्डच्या समस्या, दारिदय रेषेखालील लोकांच्या सर्व्हेक्षणा बाबतीत विविध समस्येवर या जनजागृती यात्रे दरम्यान उहापोह करण्यात आला. ग्रामीण भागातील सर्वात तीव्र स्वरूपाची समस्या म्हणजे दारूचे व्यसन. यासंदर्भात ग्रामीण भागातील महिला जास्त आक्रमक दिसून येत आहेत. या जनजागृती यात्रेत उपस्थित होणारे हे मुद्ये व ग्रामीण महिलांच्या सशक्तीकरणासाठी हिरकणी महिला उत्कर्ष प्रतिष्ठाण लढा उभारेल असे आश्‍वासन वृषालीताई बोंद्रे यांनी यात्रेत आयोजित कार्यक्रमात बोलतांना केले. यासाठी ग्रामीण भागातील महिलांनी पुढे येवून हिरकणी महिला उत्कर्ष प्रतिष्ठाण राबवित असलेल्या शाखा स्थापना व सदस्य नोंदणी मोहिमेत सहभागी होण्याचेही आवाहन त्यांनी यावेळी केली. ही जनजागृती यात्रा साकेगांव, माळशेंबा, भोगावती, भोकर, पळसखेड दौलत व गोद्री या गावात पोहचली तेव्हा ग्रामीण महिलांनी या यात्रेचे स्वागत केले. उपरोक्त गावात संपन्न झालेल्या कार्यक्रमात साकेगांव येथील प्रकाश निकाळजे, आंबादास पाटील, छत्रपती लोखंडे, जगन्नाथ लोखंडे, सरपंच विलास पाटील, उपसरपंच विमलबाई निकाळजे, रेखाबाई लोखंडे, माळशेंबा येथील दिलीप कार्ले, मधुकर म्हस्के, व इतर भोगावती येथील गजानन डुकरे, सुगंदाबाई समाधान डुकरे, प्रतिभा विलास डुकरे, शशिकला सुरेश डुकरे, राजकोर डुकरे, सविता राजेश डुकरे, शेषराव देवराव डुकरे, लिबांजी पुंजाजी डुकरे, गणेश भानदास डुकरे, प.ल.शेळके, भोकर येथील भागवत नेवरे, पळसखेड दौलत येथील संरपंच श्रीमती लाताताई गायकवाड, प.स.सदस्या विमलबाई लहाने, ग्रा.प.सदस्या शिलाबाई ज्ञानेश्‍वर गायकवाड, सरला सुभाष गायाकवाड, विजया गजानन गायकवाड, महिला सदस्या, गावातील संपुर्ण महिला बचत गटाच्या सदस्या, राजे छत्रपती मित्र मंडळाचे सदस्य, तसेच गावातील महिलांची व नागरीकांची मोठया संख्येने उपस्थिती होती. तर गोद्री येथील तुकाराम उंबरकर, कैलास सुरडकर, रंगनाथ परीहार, संजय परिहार, शफिकभाई, यांच्यासह नागरीक आणि महिला मोठया संख्येने उपस्थित होत्या.