शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

ट्रकची बसला धडक; वृद्ध महिला ठार, २६ जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:39 IST

देऊळगाव राजा : भरधाव ट्रकने बसला धडक दिल्याने एक वृद्ध महिला ठार, तर २६ प्रवासी जखमी झाले. यापैकी नऊ ...

देऊळगाव राजा : भरधाव ट्रकने बसला धडक दिल्याने एक वृद्ध महिला ठार, तर २६ प्रवासी जखमी झाले. यापैकी नऊ जण गंभीर असल्याने त्यांना जालना येथे उपचारासाठी हलवण्यात आले आहे. ही घटना २३ ऑगस्ट राेजी दुपारी घडली.

परिवहन मंडळाची बस औरंगाबादवरून यवतमाळकडे साेमवारी दुपारी देऊळगाव राजामार्गे जात होती. जालना बायपासवर विरुद्ध दिशेने येणाऱ्या मालवाहू ट्रकने (क्र. एमएच १८ बीएच १९१९) बसला धडक दिली. यामध्ये बसमधील महिला गयाबाई खंडारे (वय ६५) या जागेवरच ठार झाल्या. तसेच २६ जण जखमी झाले. त्यापैकी नऊ जण गंभीर जखमी असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी जालना येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. गंभीर जखमीमध्ये कोमल सोनवणे (३०, शिराळा), दिगंबर दत्ता वाळे, गारखेडा, सुशीला पवार, विकास आरसा रिसोड, श्याम सुरेश गोफणे (औरंगाबाद), रजीहा मुन्नीवाले (कारंजा लाड) व मारुती धनाजी हरकळ (जालना), मुसा बाबू मुन्नीवाले (कारंजा लाड), संगीता मारोती हरकळ, (आंबा, ता. परतूर) या गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी जालना येथे हलविण्यात आले. बसचालक मोहसीन करीम शेख यांच्या फिर्यादीवरून देऊळगाव राजा पाेलिसांनी ट्रकचालकाविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला असून, अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक किरण खाडे करीत आहेत.

एसटी महामंडळाकडून दहा हजार रुपयांची मदत

अपघातानंतर चिखली येथील विभाग नियंत्रक पवार यांनी भेट दिली तसेच विभागीय वाहतूक अधीक्षक अमृत कच्छवे, चिखली आगार व्यवस्थापक व्ही. श्री. वाकोडे, वाहतूक नियंत्रक एस.टी. ढोणे, एस. पी. परदेशी, शिवानंद जायभाय, चिखली आगारचालक आदींनी जखमींची भेट घेऊन त्यांना प्रत्येकी १० हजार रुपयांची तातडीची मदत दिली.

बसचा झाला चुराडा

औरंगाबाद - यवतमाळ या बसमध्ये एकूण ३७ प्रवासी प्रवास करीत हाेते. जालना बायपासवर येताच भरधाव ट्रकने बसला जबर धडक दिली. ही धडक एवढी भीषण हाेती की बसच्या मागील भागाचा चुराडा झाला.