शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

जगदंबा मातेची आज विसर्जन मिरवणूक

By admin | Updated: October 24, 2016 02:43 IST

खामगाव येथे सोमवारी आयोजित जगदंबा माता विसर्जन मिरवणुकीसाठी चोख बंदोबस्त.

खामगाव, दि. २३- शहर व परिसरातील जगदंबा (शांती) उत्सवाची सांगता सोमवारी विसर्जन मिरवणुकीने होणार असून, मिरवणुकीच्या अनुषंगाने शहरात तगडा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. यावर्षी शहर व परिसरात ७८ सार्वजनिक जगदंबा उत्सव मंडळांकडून कोजागिरी पौर्णिमेपासून जगदंबा उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. या उत्सवाची सांगता २४ ऑक्टोबर रोजी होत आहे. यानिमित्ताने शहरातील प्रमुख मार्गावरून विसर्जन मिरवणूक निघणार आहे. यावेळीही डी.जे. वाजविण्याला बंदी असून, रात्री १0 वाजे पर्यंंंतच वाद्य वाजविता येणार आहे. या मिरवणुकीच्या अनुषंगाने सुमारे ८00 कर्मचार्‍यांचा तगडा पोलीस बंदोबस्त लावण्या त आला आहे. यासाठी रविवारी शहर पोलीस स्टेशनच्या आवारात अपर पोलीस अधीक्षक यशवंत सोळंके, उपविभागीय पोलीस अधिकारी रुपाली दरेकर यांनी बंदोबस् तावरील पोलीस कर्मचार्‍यांना सूचना दिल्या. यावेळी शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार डी.डी. ढाकणे, शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे ठाणेदार संतोष ताले, ग्रामीण पो.स्टे.चे ठाणेदार शिंदे, शेगाव ग्रामीणचे ठाणेदार डाबेराव आदींसह बंदोबस्तावरील पोलीस कर्मचारी व गृहरक्षक दलाचे जवान उपस्थित होते.