शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

मेंहदी लावायच्या हातावर सॅनिटायझर लावण्याची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:36 IST

या वर्षी उन्हाळ्यात लग्नसराईत अनेकांनी लग्नाच्या तारखा काढून त्या दृष्टीने लगीनघाई सुरू केली होती. मात्र, ऐन मार्च महिन्यात कोरोनाचे ...

या वर्षी उन्हाळ्यात लग्नसराईत अनेकांनी लग्नाच्या तारखा काढून त्या दृष्टीने लगीनघाई सुरू केली होती. मात्र, ऐन मार्च महिन्यात कोरोनाचे संकट आले. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर पाहून सर्वांनीच धास्ती घेतली. आपल्या मुलांचे लग्न अशा कठीण काळात कसे लावायचे, याची चिंता वधू-वर पित्यांना पडली आहे. एप्रिल व मे या दोन महिन्यांत विवाह मुहूर्त जास्त असतात. अगोदरच सहा महिन्यापासून वधू-वर पित्यांनी विवाहाची तारीख निश्चित करून मंगल कार्यालय व मंडप डेकोरेशन बुक केले होते. लग्नसराईची लगबग व धावपळही सुरू होती, परंतु मार्च अखेर व एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासूनच कोरोना संसर्गाबाबत जनजागृती वाढली व कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी लॉकडाऊन आणि कडक निर्बंध लागू करण्यात आले. लॉकडाऊनचा वाढता कालावधी वधू-वर पित्यांसाठी चिंतेचा विषय ठरला. ग्रामीण भागात कोरोना रुग्ण मोठ्या संख्येने निघत असल्याने व अनेकांचा मृत्यूही होत असल्याने विवाह सोहळे मोजक्‍याच उपस्थित लावण्याचे निर्बंध लादण्यात आले आहेत. स्थानिक ग्रामपंचायत, पोलीस यंत्रणाही विवाह सोहळ्यातील उपस्थितीवर लक्ष ठेवून असल्याने, वधू-वर पित्यांसमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत.

लग्नाची घाई करू नका, पुढेही आहेत लग्नाचे मुहूर्त

आपल्या लाडक्या मुला-मुलीचे लग्न धूमधडाक्यात व्हावे, म्हणून अनेक वधू-वर पिता लपून छपून विवाह आयोजित करीत आहेत. पुढील काही महिन्यात मुहूर्त नाहीत, असा चुकीचा समज करून विवाह समारंभ आयोजित केल्यामुळे रुग्णसंख्या वाढत आहे. लग्नाची घाई करू नका, पुढेही आहेत लग्नाचे मुहूर्त असे म्हणण्याची वेळ आली आहे.