शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
3
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
4
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
5
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
6
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
7
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
8
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
9
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
10
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
11
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
12
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
13
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
14
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
15
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
16
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
17
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
18
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
19
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
20
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
Daily Top 2Weekly Top 5

साडेतीन वर्षीय चिमुकलीची कर्करोगाशी झुंज!

By admin | Updated: October 28, 2016 02:42 IST

प्रांजलच्या उपचारासाठी शेळके कुटुंबीयांची मदतीची याचना.

देऊळगाव मही, दि. २७- खेळण्याचं, बागडण्याचं, हसण्याच्या वयात प्रांजलला कर्करोगासारख्या भीषण आजाराने ग्रासले असून, तिच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. आर्थिक परिस्थिती हलाखीची असलेल्या शेळके कुटुंबीयांना मदतीची गरज आहे. सुरेश शेळके हे मूळचे शिरपूर येथील रहिवासी असून, काही वर्षांंपूर्वी उदरनिर्वाहासाठी देऊळगाव मही येथे स्थायिक झाले. ते येथे संगणक प्रशिक्षण केंद्र चालवितात. जिद्द, चिकाटी, मेहनतीच्या जोरावर सर्व आर्थिक संकटावर मात करत त्यांनी आपला व्यवसाय तसेच संसाररुपी गाडा सुरळीत सुरू केला. प्रांजल एकुलती एक कन्या असल्याने शेळके कुटुंबीयांनी विविध स्वप्ने रंगवायला सुरुवात केली. तिला सहकार विद्या मंदिर देऊळगाव मही येथे प्री-प्रायमरी नर्सरी शाळेत टाकण्यात आले. काही दिवसांपूर्वी प्रांजलला ताप येत असल्याने चिखली तसेच बुलडाणा येथे उपचारासाठी भरती करण्यात आले. मात्र, निदान न झाल्याने त्यांनी औरंगाबादला धाव घेतली. येथील डॉक्टरांनी त्यांना टाटा मेमोरियल जाण्यास सांगितले.डॉक्टरांनी त्या ठिकाणी ब्लड कॅन्सर झाल्याचे निदान केले असून, चिमुकली प्रांजल किमोथेरपीच्या वेदना सहन करीत आहे. शेळके कुटुंबीयांची सर्वसाधारण परिस्थिती हलाखीची आहे. डॉक्टरांनी उपचारासाठी कमीत कमी खर्च पाच लाख रुपये सांगितला असून, या कुटुंबीयापुढे आ िर्थक संकट कोसळले आहे. प्रांजल जीवन मरणाच्या उंबरठय़ावर उभी आहे. समाजातील दानशूरांनी मदत केल्यास मृत्यूच्या दाढेतून तुमच्या अल्पशा मदतीने चिमुकलीची सुटका होऊ शक ते. दिवाळीची अल्पशी भेट प्रांजलला देईल जीवनदानसमाजातील दानशूर व्यक्ती, विविध सामाजिक संस्था तसेच असंख्य विद्यार्थी, विद्यार्थिनी अनावश्यक खर्च टाळून दिवाळी सणाच्या पर्वावर अल्पशी आर्थिक भेट दिल्यास जीवन-मरणाच्या उंबरठय़ावर असलेल्या प्रांजलला जीवनदान मिळू शकते. तसेच सर्व स्तरातून मदत करण्याचे आवाहन होत आहे.