मोताळा : तालुक्यातील आव्हा येथील भागवत कडू घोंगटे या शेतकर्याचे २५ जुलै रोजी तीन बैल आव्हा शिवारातून चोरीला गेले होते. या प्रकरणात धामणगाव बढे पोलिसांनी त्याच दिवशी शे आरीफ शे सत्तार रा. मोताळा याला वडगाव शिवारामध्ये अटक केली होती; मात्र या गुन्हय़ात सहभागी असणार्या आणखी तिघांना धा. बढे पोलिसांनी २९ जुलै रोजी अटक करून त्यांच्यावर गुन्हे दाखल केले.आव्हा येथील शेतकर्याचे तीन बैल चोरून चौघे जण मालवाहक गाडीसह जात असताना वडगाव रोडवर गाडी चिखलामध्ये फसली होती. यावेळी नागरिकांच्या लक्षात ही बाब आल्यानंतर या गाडीतील तीन आरोपी पसार झाले होते; मात्र पोलिसांनी त्याच दिवशी शे आरीफ याला अटक करून मालगाडीसह ताब्यात घेतले होते. तेव्हापासून या गुन्हय़ात सहभागी शेख अफसर शे कादर(वय १९), शेख अफरोज शे आसीफ (वय १९) दोघेही रा. मोताळा व शेख अफसर शेख सत्तार (वय २६) रा. इकबाल चौक बुलडाणा हे फरार होते.पोलिस तपासात हे तीनही आरोपी असल्याचे निष्पन्न झाल्याने काल २९ जुलै रोजी त्यांना अटक करून गुन्हे दाखल करण्यात आले.
बैल चोरी प्रकरणातील तीन आरोपींना अटक
By admin | Updated: July 31, 2014 01:26 IST