शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

हगणदरीत जाणाऱ्यांची ‘सायंकाळ’ही होणार वाईट!

By admin | Updated: April 27, 2017 01:51 IST

खामगाव: शहरातील उघड्यावरील हगणदरीला आळा घालण्यासाठी पालिका प्रशासनाच्यावतीने कठोर पावलं उचलल्या जात आहेत.

खामगाव: शहरातील उघड्यावरील हगणदरीला आळा घालण्यासाठी पालिका प्रशासनाच्यावतीने कठोर पावलं उचलल्या जात आहेत. गुड मॉर्निंग पथकाची वेळ चुकवून उघड्यावर ‘शौच’ करणाऱ्यांची आता पुढे खैर नसल्याचे संकेत आहेत. गुड मॉर्निंग पथकाच्या धर्तीवर गुड इव्हिनिंग पथकाची पालिका प्रशासनाकडून तयारी करण्यात आली आहे. त्यामुळे उघड्यावर हगणदरी करणाऱ्यांची सायंकाळही आता वाईट होणार असल्याचे संकेत आहेत. स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत शहरात उघड्यावरील हगणदरी रोखण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. पालिका प्रशासनाकडून गेल्या काही दिवसांपासून विविध उपाययोजना आणि जनजागृतीही केल्या जात आहे. दरम्यान, पालिका प्रशासनाच्या सूचना आणि कारवाईकडे कानाडोळा करणाऱ्यांविरोधात पालिका प्रशासनाने धडक मोहीम हाती घेतली आहे. यामध्ये टमरेल जप्ती मोहीम, उघड्यावर शौच करणाऱ्यांची ‘वरात ’ आदी उपाययोजना करण्यात आल्या. दरम्यान, उघड्यावरील हगणदरी रोखण्यासाठी खामगाव पालिकेच्यावतीने गुड मॉर्निंग पथकही कार्यान्वित आहेत. तथापि, या पथकाची वेळ चुकवून उघड्यावर हगणदरी करणाऱ्यांची संख्या लक्षात घेता, पालिका प्रशासनाच्यावतीने आता गुड इव्हिनिंग पथकही कार्यान्वित करण्यात आले आहे. गुड मॉर्निंग पथकाच्या धर्तीवरच गुड इव्हिनिंग पथक कार्य करणार आहे.