शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

तापमान ४२ अंशावर : जीवनमान विस्कळीत

By admin | Updated: May 14, 2017 20:13 IST

मोताळा: मोताळ्यासह परिसरात सध्या उन्हाचा पारा जबरदस्त वाढला आहे. काही दिवसांपासून तापमान ४२ अंशापर्यंत जाऊन पोहोचल्याने तालुकाभरातील जीवनमान विस्कळीत झाले आहे.

उन्हामुळे पेरणीपूर्व मशागतीची कामे रखडली

मोताळा: मोताळ्यासह परिसरात सध्या उन्हाचा पारा जबरदस्त वाढला आहे. काही दिवसांपासून तापमान ४२ अंशापर्यंत जाऊन पोहोचल्याने तालुकाभरातील जीवनमान विस्कळीत झाले आहे. चढत्या पाऱ्यामुळे शेतकऱ्यांच्या पेरणीपूर्व मशागती लटकल्या आहेत.मागील पंधरवाड्यापासून मोताळा परिसरात तापमानाच्या पाऱ्यात चढ-उतार होत आहे. मध्यंतरी ढगाळ वातावरण आणि काही प्रमाणात वारा यामुळे तापमान घसरले होते. मात्र आठवडाभरापासून ४२ अंशापर्यंत गेलेले तापमान ३८ ते ३९ अंशापर्यंत कायम आहे. त्यामुळे उन्हाचा तडाखा चांगलाच जाणवू लागला आहे. गेल्या तीन दिवसांपासून तापमानात वाढ होत आहे. रविवारचे तापमान ४२ अंशापर्यंत कायम होते. तापमानातील या अचानक बदलांमुळे नागरिकांना विविध आजारांनादेखील सामोरे जावे लागत आहे. कडक उन्हामुळे दुपारच्यावेळेस शहरासह परिसरात शुकशुकाट दिसून येत आहे. याचा परिणाम बाजारपेठेवरही मोठा झाला आहे. उष्णतेमुळे पाण्याची पातळीही वेगाने घटू लागली आहे. परिसरातील विहीरी, बोअर, लघू प्रकल्प कोरडे पडण्यास सुरवात झाली आहे. दुपारच्यावेळी उन्हाचे असह्य चटके सहर होत नसल्यामुळे याचा मोठा परिणाम शेतकरी, शेतमजुरांवर दिसून येत आहे. दुपारच्यावेळी काम करणे अत्यंत कठीण झाल्याने पेरणीपूर्व मशागती रखडल्या आहेत. त्यामुळे परिसरातील शेतकरी चिंताग्रस्त बनले आहेत. मध्यरात्रीनंतर गारवा वाटत असला, तरी सकाळी आठ वाजेपासून उन्हाचे चटके लागत आहेत. काही शेतकऱ्यांनी मशागतीची कामे मागे पडू म्हणून रात्रीच्यावेळेस काम करणे सुरू केल्याचे चित्र दिसून येत आहे.