शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार
2
"...तर मस्क यांना दुकान बंद करावे लागले असते!"; ईव्ही सब्सिडीसंदर्भात ट्रम्प यांची मस्क यांना थेट धमकी
3
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक
4
Paetongtarn Shinawatra: कोण आहे 'ती' व्यक्ती; जिच्याशी फोन कॉल 'लीक' झाल्याने गेलं शिनावात्रा यांचं पंतप्रधानपद
5
“नाना पटोलेंना चर्चेत येण्यासाठी PM मोदी यांच्या नावाचा आधार लागतोय”; एकनाथ शिंदेंचा टोला
6
५०-१०० नव्हे, पाकिस्तानच्या तुरुंगात तब्बल 'इतके' भारतीय कैद! पहिल्यांदाच झाला मोठा खुलासा
7
"हार्डवेअर चांगलं होतं पण सॉफ्टवेअर खराब...", शेफाली जरीवालाच्या मृत्यूबाबत रामदेव बाबांचं वक्तव्य
8
धक्कादायक! प्रेमी युगुलाने ऑटोत घेतला गळफास; तरुणीचे लग्न ठरल्याने उचलले टोकाचे पाऊल
9
महाराष्ट्रात आजपासून वाहनांवरील नवीन करप्रणाली लागू; सीएनजी असो की पेट्रोल किंवा डिझेल... एवढा कर...
10
मंडीमध्ये ढगफुटीमुळे प्रचंड नुकसान; घरं, रस्ते, पूल गेले वाहून, ४ जणांचा मृत्यू, १६ बेपत्ता
11
गॅस सिलेंडर घेताना या बाबींची करा पडताळणी, टळेल संभाव्य धोका
12
Viral Video: इंदूरचा सुवर्ण महाल!! वॉश बेसिन ते इलेक्ट्रिक स्विच... सारं काही २४ कॅरेट सोन्यानं मढवलेलं...
13
बाजारात शांतता! गुंतवणूकदारांची 'वेट अँड वॉच'ची भूमिका; रिलायन्स-एचडीएफसीसह 'हे' शेअर्स वधारले
14
भारतापासून १४ हजार किलोमीटर दूर 'या' देशात राहतात असंख्य भारतीय! दरवर्षी साजरी होते दिवाळी
15
ठरलं! 'या' दिवशी जाहीर होणार सीए २०२५ परीक्षेचा अंतिम निकाल; कधी आणि कुठे पाहायचा?
16
"शेतकऱ्यांसाठी खासदारकीचा राजीनामा तोंडावर फेकला तर निलंबनाचे काय, शेतकऱ्यांसाठी...’’, निलंबनानंतर नाना पटोले आक्रमक 
17
सावत्र बापच बनला हैवान! आईला जीवे मारण्याची धमकी देऊन मुलीवर करत होता बलात्कार; मुलगी गर्भवती होताच...
18
Photo: देशातील नंबर-१ इलेक्ट्रिक स्कूटरचे नवीन मॉडेल लॉन्च, एका चार्जवर १२१ किमी धावणार!
19
आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न, ताफ्यावर फेकली बाटली, बाटलीत होतं... 
20
चातुर्मास कधीपासून सुरू होणार? व्रत-वैकल्ये, सण-उत्सवांची रेलचेल; पाहा, महात्म्य अन् मान्यता

कोरोना नियंत्रण मोहिमेत शिक्षकांना विमा कवचच नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 04:33 IST

बुलडाणा : कोरोना साथरोग नियंत्रण उपाययोजना मोहिमेत सेवा संलग्न करण्यात आलेल्या शिक्षकांना विमा सुरक्षेचा लाभ मिळत नसल्यामुळे शिक्षकांमध्ये असुरक्षिततेची ...

बुलडाणा : कोरोना साथरोग नियंत्रण उपाययोजना मोहिमेत सेवा संलग्न करण्यात आलेल्या शिक्षकांना विमा सुरक्षेचा लाभ मिळत नसल्यामुळे शिक्षकांमध्ये असुरक्षिततेची भावना आहे. केंद्र सरकारतर्फे कोरोनासंबंधी काम करणाऱ्या शिक्षकांसह सर्वांनाच ५० लाखांचा विमा जाहीर करण्यात आला होता. मार्च महिन्यात त्याची मुदत संपली असून, पुन्हा याचे नूतनीकरण झाले नाही. कोरोना नियंत्रण मोहिमेत शिक्षकांना विमा कवचच नसल्याने शिक्षकांमधून नाराजी व्यक्त होत आहे. मागील वर्षभरापासून आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत इतर कर्मचाऱ्यांप्रमाणे शिक्षकांच्या सेवासुध्दा कोरोना साथरोग नियंत्रण उपाययोजना मोहिमेत संलग्न करण्यात आल्या आहेत. या मोहिमेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पन्नास लाख रुपयांचे विमा कवच लागू करण्यात आले होते. त्याची मुदत २४ मार्च रोजी संपली. सध्या कोरोनाची दुसरी लाट असून, अनेकांना हा आजार होत आहे. या परिस्थितीत शिक्षकांनी ट्रेसिंग, सर्वेक्षण, समन्वय आदी कामे करावी लागत आहेत. हे काम करताना शिक्षकांना विमा संरक्षण कवच देण्यात आलेले नाही. आरोग्यसेवेचे कुठलेही प्रशिक्षण नसताना शिक्षकांना भीतीयुक्त वातावरणात काम करावे लागत असल्याची प्रतिक्रिया शिक्षकांनी दिली. तसेच या शिक्षकांना लसीकरणसुध्दा करण्यात आलेले नाही. विमा संरक्षण नसल्यामुळे कोरोनाने मृत झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांना लाभ मिळाला नाही. सध्या कोरोनाचा कहर वाढला आहे. दिवसेंदिवस बाधितांची संख्याही वाढत आहे, मृत्यूंचेही प्रमाण वाढत आहे. त्यामुळे जे शिक्षक कोरोना रोखण्यासाठी सेवा देत आहेत, त्यांना विमा संरक्षण कवच देण्यात यावे, अशी मागणी शिक्षकांकडून होत आहे.

कोरोना नियंत्रण मोहिमेत शिक्षकांना विमा कवच देणे अत्यावश्यक आहे. शिक्षकांकडून कोरोनासंबंधित काम करवून घेत असताना सर्वच शिक्षकांना मास्क, सॅनिटायझरसारख्या सोयी द्यायलाच हव्यात. रुग्णालयात त्यांच्यासाठी स्वतंत्र बेडची व्यवस्था हवी. तसेच लसीकरणात त्यांना प्राधान्य द्यायला हवे.

- डी. डी. वायाळ, अध्यक्ष, जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षक संघ.

कोरोनाच्या काळात काम करताना शिक्षकही कोरोनाबाधित होत आहेत. त्यामुळे शिक्षकांना विम्याचा लाभ मिळावा, यासाठी मुख्यमंत्र्यांसह ग्रामविकास मंत्र्यांकडे मागणी करण्यात आलेली आहे. सर्वच शिक्षकांना कोरोनाच्या काळात विमा संरक्षण व वारसांना ५० लाखांची मदत देण्यात यावी.

- सुनील मगर, विभागीय प्रसिद्धीप्रमुख, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती.