महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीमध्ये अध्यक्षपदासाठी ४ सप्टेंबर रोजी एकूण चार अर्ज प्राप्त झाले होते. यातून दोन अर्जदारांनी सभेतच माघार घेतली. उरलेल्या दोन अर्जामध्ये चुरशीची लढत दिसून आली. यावेळी सोशल डिस्टन्सिंगला न जुमानता आवडीच्या अध्यक्षपदासाठी तुफान गर्दी करण्यात आली होती. उर्वरित दोन अर्जातून सय्यद जलील यांनी अर्ज मागे घेतल्याने अखेर महम्मद यारखान यांची एकमताने निवड करण्यात आली. पहिल्या सभेत तंटा होऊन तक्रारी दाखल झाल्याने या तंटामुक्त अध्यक्ष निवडीकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
पोलीस बंदोबस्तात निवड
सरपंच भगवानराव उगले यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा पार पडली. यावेळी निरीक्षक अशोक बुरुकुल, मनोज मोरे परमेश्वर दानवे, कृषी सहायक खंडू चौधरी, पोलिस प्रशासनाच्या वतीने ठाणेदार यांच्या मार्गदर्शनाखाली नारायण गीते, विशाल बनकर आदी उपस्थित होते. पोलीस बंदोबस्तात निवड पार पडली.