शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:40 IST

मेहकर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांवरील खोटे गुन्हे खारीज करावे, यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हाध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर ...

मेहकर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांवरील खोटे गुन्हे खारीज करावे, यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हाध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर टाले यांच्या नेतृत्वामध्ये मेहकर तहसीलदार यांना २३ सप्टेंबर रोजी निवेदन देण्यात आले. मेहकर तालुक्यातील काही शेतकऱ्यांच्या दुय्यम निबंधक कार्यालयातील कामासंदर्भात सुनील चव्हाण, प्रमोद पाटील यांच्या बाबतीत तक्रारी प्राप्त झाल्यानंतर या शेतकऱ्यांच्या वतीने त्यांची कामे अडवून ठेवून पैशांची मागणी केलेल्या संबंधित कर्मचाऱ्यांना याबाबत प्रमोद पाटील यांना जाब विचारला तर दुय्यम निंबधक कार्यालयातील लिपीक प्रमोद पाटील यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे स्थानिक कार्येकर्ते सागर कानोडजेसह इतर दोन जणांना २२ सप्टेंबर रोजी मेहकर पोलीस स्टेशन येथे खोट्या गुन्ह्यात अडकवून वरिष्ठांच्या दबावामुळे ही कार्यवाही केली. यावेळी महाराष्ट्रातील दुय्यम निंबधक कार्यालयातील कर्मचारी संपावर असतांना देखील ही खोटी कार्यवाही केली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्तेवरील खोटे गुन्हे तत्काळ खारीज करावे. अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हाभर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात येत आहे. निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी, सह जिल्हानिंबधक श्रेणी १, पोलीस अधीक्षक बुलडाणा यांना देण्यात आल्या. यावेळी तालुका अध्यक्ष प्रफुल्ल देशमुख, शहर अध्यक्ष अशफाक शहा, ऋषांक चव्हाण, देवेंद्र आखाडे, कैलास उतपुरे, अभिमन्यू देशमुख, सतीश देशमुख, मिथुन साळवे, प्रवीण उतपुरे, डिंगांबर सरकटे उपस्थित होते.